पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ
भव्य राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धां लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. व्योम
प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेतर्फे पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती चषक या
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नामदेव ढसाळांच्या साहीत्यावर प्रेम करणारी,
कलाक्षेत्रात वावरणारी तरुण मंडळी मोठ्या जल्लोषात या स्पर्धेची तयारी करीत आहेत.
एकीकडे स्पर्धेचे पोस्टर्स-बॅनर्स सगळीकडे रसिकांचे लक्ष वेधुन घेत आहेत तर
फेसबुककर मंडळीमध्येही या स्पर्धेची जोरदार चर्चा होत आहे.
Sunday, 26 January 2014
Friday, 24 January 2014
निवडणुकीचे सर्वे-क्षण
निवडणुका तोंडावर आल्यायत..कोण जिंकेल कोण हरेल देवास ठावूक..पण सर्वच राजकीय पक्षांची सध्या जय्यत तयारी चालली आहे. कधी स्वपक्षीयांच्या चुकांना वोट-बॅंक मूळे पाठीशी घातल जातय तर कुठे उगीच विरोधकांना विरोधक म्हणुन विरोध करायच चाललय. कोणी नवीन पक्ष तयार केले आहेत तर कोणी आलटी-पलटी मारुन पुन्हा त्याच पक्षात येत आहेत. आपल्यासोबत कोणी राजकारण खेळलेल मला आवडत नाही. पण राजकारणाच्या गप्पा बोलायला-ऐकायला मात्र आवडतात.
असच राजकारणाविषयी बोलतचालत असताना एका मित्राने राजकारणाच काम आणल. निवडणुकीच्या तोंडावर एका मिडीया रिसर्च ब्युरोसाठी निवडणुकीचा सर्वे करायचा होता. निवडणुकीच्याआधी लागणारा एक्सीस्ट पोल हा अशा सर्वेमधुनच लागत असावा. मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन जनमताचा अंदाज बांधायचा होता. मानल तर कठीण, दगदगीच काम होतपण आणि नाही पण. मला मात्र काम करण्यात मज्जा येणार होती. कारण बरेच दिवसांनी ग्राउंडलेवलवर काम करायला मिळणार होत आणि महत्वाच म्हणजे पैसेही चांगले मिळणार होते.प्रत्येक आमदाराच्या मतदार संघात सहा नगरसेवक..त्या प्रत्येक विभागाचा मॅप प्रत्येकाकडे होता. प्रत्येक मतदारसंघात एक शिवाजी नगर, एखाद भिम नगर तसेच दर्गा रोड हे मोहल्ले हमखास दिसत होते. कोणाच्या घरी जाउन विचारण्याची मुभा नव्हती. कोणीही सुशिक्षीत-अशिक्षीत नागरीक ज्याला मतदानाचा हक्क असेल अशा मतदारांशी चर्चा करायची होती. प्रत्येकाला बाटलीत उतरवायच होत. कोणाला वैयक्तीक काही न विचारता राजकारणाविषयी त्याच्याकडची सरव माहीती बोलता बोलता काढुन घ्यायची आणि त्यावरुन फॉर्म भरत संध्याकाळी रिपोर्ट बनवायचा. प्रत्येक विभाग हा जास्तीकरुन त्याच्या धर्मावरुन एखाद्या पक्षाची व्होट बॅंक बनला आहे अस प्रथमदर्शनी दिसुन आल. महागाई, भ्रष्टाचार वाढला अस मान्य करतही मुस्लिम बांधवाचं कॉंग्रेसप्रेम दिसलं. काही उत्तर भारतीय बांधवानी या निमित्ताने राज ठाकरेंवर चांगल तोंडसुख घेतल. भिमसैनिक तर कोणाच्या मागे जायच, कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवायचा याबाबत साशंक दिसले. पण जास्तीत जास्त माणस ही हमको क्या करना है..हम भले..हमारा काम भला..अशाच विचाराचे होते. नरेंद्र मोदींच्या कामाबद्दल माहीत नाही तरी मोदी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त करणारेही भेटले. नमोंच्या सोशल मिडीयाची जादु बर्यापैकी चाललेली दिसत होती. दिल्लीत आम आदमी पार्टीच्या स्थापनेनंतर मतदार थोडे बुचकळ्यात पडले. आम आदमी पार्टीची उमेदवारी अजुन घोषित केली नव्हती तरी मतदारांना आम आदमी पार्टीचा उमेदवार विभागातुन यावा असे दिसले. गेल्यावेळी नमोंच्या नावाचा जप करणारी मंडळी आम आदमी वर खुष होती. आम आदमीला पुढे करुन कॉंग्रेसने भाजपासोबत शाळा खेळली की काय अस वाटायला लागल. पण अस असेल तर भाजपपेक्षा कॉंग्रेस-कॉंग्रेस करणारेच महागाई, भ्रष्टाचाराला कंटाऴुन आम आदमी महाराष्ट्रातही जादु करण्याची वाट बघत होते. शेवटी हे राजकारणच..कधी काय होईल सांगता येत नाही..आपल्याला काय करायचय याच मताचा मीही कधी होतो असेन. पण एक मात्र शिकायला मिळाल आपले मतदार असण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्व देतात. थोड्या दिवसांत गल्लीपासुन दिल्लीच्या राजकारणातले क्षण ऐकायला मिळाले, निवडणुकीचे सर्वे-क्षण एंजोय करता आले.
-प्रवीण दाभोळकर
Sunday, 19 January 2014
अधिकार माहीतीचा...
आपला देश सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी एक यंत्रणा काम करत असते. आपले लोकप्रतिनीधी असलेले नगरसेवक, आमदार, खासदार, ते पंतप्रधान, राष्ट्रपती ही मंडळी आपल प्रतिनिधीत्व करत असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आपल्याला दिला गेला आहे. माहीतीचा अधिकार कलम 205 अन्वये आपण संबधित अधिकार्याकडुन माहीती मागवू शकतो.
ज्याबद्दल आपल्याला खुप कमी व अर्धवट माहीती असते. माहीतीच्या अधिकाराची ही यंत्रणा आपण संमजावुन घेतली तर अनेक सरकारी कामांची आपण माहीती मिळवु शकतो. यासंबधी सविस्तर माहीती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अनिल गलगली सरांचा लेक्चर आयोजला होता.माहीतीच्या अधीकराचा उपयोग करुन अनिल गलगली सरांनी आदर्श घोटाळ्याचे धागेदोरे बाहेर काढले होते. सरकारी यंत्रणेतील अनेक घोटाळे-कारस्थान अनिल सरांनी बाहेर काढून प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचवली आहेत. सरांचे बरेच किस्से ऐकण्या-शिकण्यासारखे होते. प्रत्येकाने किमान दोन आर.टी.आय मागवुन याला सुरुवात करावी एसा सल्लाही आम्हाला दिला. थोड्या दिवसांनी सामना ऑफीसजवळ सरांची भेट घेउन एक आर.टी.आय मागवला..त्याच उत्तर येईल तेव्हा खर..पण पत्रकार म्हणुन आपल्याला अशा गोष्टींची सवय स्वतःला केली पाहीजे, अस सरांचही मत होत.
अनेकजण माहीतीच्या अधिकाराचा उपयोग स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी करीत असतात. अशा मंडळींना धोक्याची जास्त भिती असते. कोणताही वैयक्तीक फायदा न पाहता लोकहीतासाठी माहीतीच्या अधिकाराचा उपयोग केला तर घाबरण्याची काळजी नाही, असेही ते म्हणाले.
-प्रवीण दाभोळकर
शेवटच्या पानाची खंत...
जनरली आपण जे मराठी बोलतो त्यात किती चुका करत असतो हे आपल आपल्याला ही कळत नसत. तरीही ते गोळा केलेल मराठी आपण अभिमानाने एखाद्यच्या माथी मारतो. अभिमानाने मी मराठीचा टेंबा मिरवत असतो. दरवर्षी शाळेच्या पाठ्यपुस्ताकतल शेवटचं शुद्धलेखनाच पान आम्ही पलटुन कधी बघितलच नव्हत. ते जर पाहील असत तर आज आमच्या शुद्धलेखनाच्या चुकाच कोणी काढल्या नसत्या. तेव्हा शिक्षकांनीही कधी आमच्या लक्षात आणल नाही आणि शिक्षण मंडळांनेही कधी आग्रह धरला नाही. आयुष्याची पान कशी भराभर पलटत गेली पण त्या न पलटलेल्या पानाची किंमत आजही आम्हाला मोजावी लागत आहे. आपल्या मायबोली मराठीत आपण किती लेखनाच्या शुद्ध चुका करु शकतो हे आज कळायला लागल.
मराठी शुद्दधलेखन समजवणार्या दिपक रंगारी सरांच लेक्चर माझ्यासहीत सर्वांच्या चांगलच लक्षात राहील एवढ मात्र नक्की. आपण नेहमी लिहीत असलेल मराठी किती अशुद्ध असु शकत हे नव्याने शिकायला मिळाल. सुरुवात स्वतःच्या नावांपासुनच झाली. आपल्या नावातच र्हस्व-दिर्घाच्या एवढ्या चुका केलेल्या असतात त्या जर आपल्याला कळाल्या तर आपल नाव सांगतानाही कींचीतशी लाज वाटावी. माझ नाव सरांनी विचारल्यावर प्रविण अस मोठ्याने स्पष्ट सांगितल. ते लिहीताना प्रवीण अस लिहाव अस सरांनी सांगीतल. मग पाठोपाठ श्रुतिका, प्रीती, रवीकीरण यांचे जन्म दाखलेही बदलावे लागणार हे त्यांना पटु लागल. बाकीच्यांना तर नंतर स्वतःच नाव सांगायचीच भिती वाटु लागली. माझ्या बारश्याला रंगारी सरांसारखा एखादा व्यक्ती आला असता तर पुढे माझ्या जन्म आणि शाळेच्या दाखल्यात ही चुक झाली नसती बहुदा..असो माझ्यापुढच्या पिढीसाठी हे लक्षात राहील याचा व्यवस्था केलीय. आतापर्यंत व्याकरणाची पुस्तक व शुद्धलेखनाची पान नीट वाचली असता तर आज शिकण्यासारख अस काही नव्हत. आपल शुद्धलेखन सुधारत असताना या क्षेत्रात काम करताना बर्याचदा बॉस इस ऑल्वेज राईट हे सुद्धा लक्षात असु द्या असा गोड सल्लाही सरांनी लेक्चर संपताना दिला.
Sunday, 5 January 2014
लाख रुपयाची वेबसाइट
लाख रुपयाची वेबसाइट
प्रत्येक शनिवारच्या लेक्चरला आपण वेब जर्नलिस्टचे विद्यार्थी वेबसाईट, ब्लॉग असे अनेक प्रकार शिकत असतो. खुप कठीण पद्धती कोणी आपल्याला सोप्या करुन शिकवल तर कोणी वेबसाईटच्या माध्यमातुन लाखभर रुपये कमवायला शिकवल. पण वेबसाईट अजुन किती सोप्या रीतीने बनवता व डेव्हलप करता येऊ शकते ते आज शिकायला मिळाल.. 4 जानेवारी शनिवारचा लेक्चर सुनिल घुमे सरांचा होता. ज्यामध्ये वेबसाईट बनवायची सर्वात सोपी पद्धत सरांनी शिकवली. www.webs.com या अधिकृत साईट वरुन आपण मोफत वेबसाईट बनवु शकतो.
आतापर्यंत आपण वेबसाईट बनविण्याच्या ज्या अनेक पद्धती शिकलो त्यापैकी सर्वात सहज-सोपी पद्धत सुनिल घुमे सरांनी शिकवली. ज्याप्रमाणे आपण ब्लॉग बनवायला शिकलो तीच सोपी पद्धत इथे अवलंबता येते. ड्रीमव्हीवर सॉफ्टवेअर असेल तरच वेबसाईट चालु करता येते असा आपला समज झाला होता किंवा करुन देण्यात आला होता.
जे ड्रीमव्हीवर आपल्या ड्रीमपुरतच (स्वप्नातच) मर्यादित राहील. आय मिन कोणाकडेच डाऊनलोड झाल नाही. ज्याची पुर्ण माहीती मिळवण्यासाठी आम्ही काही विद्यार्थी मिळुन प्रायवेट ट्युशन्सला जाणार होतो..आमचे पैसे वाचविल्याबद्दल सुनिल सरांचे आभार...वर्डप्रेसवर वेबसाईट बनवणे कीचकट आहे अस या लेक्चर नंतर वाटायला लागल.आजच्या लेक्चरला फक्त 10 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ज्यापैकी 3 विद्यार्थ्यांना इनस्क्रीप्ट मराठी टायपींग न आल्याने पुन्हा घरची वाट धरावी लागली.
हेरीटेज म्हणजे काय रे भाऊ ???
हेरीटेज म्हणजे काय रे भाऊ ???
हेरीटेज म्हणजे नक्की काय
रे भाऊ ???...या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही व्याख्यानमालेत
पोहोचलो. हेरीटेज म्हणजे नक्की काय भानगड हे समजुन घेण्यासाठी आम्ही खास आमंत्रीत
होतो, त्याबद्दल पत्रकार संघाचे विशेष आभार..दिनांक 27 डिसेंबर..निमित्त होत आप्पा
पेंडसे स्मृतीदिनानिमित्त व्याख्यानमालेचे...विषय होता हेरीटेज काय व कसे..आणि
आमंत्रित व्याख्याते होते दादर विभागाचे मनसेचे आमदार नितीन सरदेसाई आणि हेरीटेज
पुर्नलोकन समिती अधिकारी दिनेश अफजलपुरकर. एखाद्या वास्तुवर हेरीटेज लागु केले तर त्या
वास्तुवर कोणतेही बांधकाम करणे बेकायदेशीर ठरते. त्यामुळे तिथल्या विकासकामाला
अडथळा येत असतो. मुंबईच्या तिनही बाजुने समुद्र आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत
असलेल्या मुंबईच्या जमिनीची भाग वाढणे केवळ अशक्य हे आपण समजुन घेतले पाहीजे.
त्यामुळे राहत्या जागेची वर्टीकल वाढ करणे किंवा त्यात विकासकाम करणे एवढाच पर्याय
मुंबईच्या नागरीकांकडे आहे. सध्या दादरकरांनी याच समस्येला वाचा फोडली आहे.
वास्तुचे पुरातनत्व टिकुन रहावे यासाठी हा कायदा पारीत करण्यात आला आहे. ज्यात
काही बदल केले तर नागरीकांसाठीही सुसह्य ठरु शकते.
हेरीटेजमुळे पुर्नविकासाला
अडथळा आल्याने दादर सारख्या विभागाची जनता रस्त्यावर उतरत आहे. असे नितीन सरदेसाई
यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले. तर भाडे नियंत्रण कायद्यातुन हेरीटेज वास्तु
धारकांना सुट देणे, उरलेली ठराविक जागा एफ.एस.आय हा टि.डी.आर कायद्यानुसार
विकण्याची परवानगी देणे, तसेच वास्तुधारकांना करामध्ये सवलत देणे अशा बदलामुळे
कायद्यात शिथीलता येईल असे मत अफजलपुरकर यांनी व्यक्त केले.
-प्रविण दाभोळकर
Subscribe to:
Posts (Atom)

.jpg)

