Friday, 28 November 2014

गडकिल्ल्यांचे आधुनिक राखणदार

****प्रवीण दाभोळकर********
 किल्ल्यांचा आदर करणारी एक नवी पिढी आपल्याला सध्या पाहायला मिळतेज्यांना हा गौरवशाली इतिहासगडकिल्ल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे. गडकिल्ल्यांचे जतन,संवर्धन करायचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही मंडळी पुरातत्त्व विभागाच्या मदतीने गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेचेडागडुजीचे काम करीत असतात. गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांना स्वच्छतेचेशिक्षणाचे महत्त्व पटवून देत असतात. हेच गडकिल्ल्यांचे आधुनिक राखणदार आहेत.डकिल्ले हे महाराष्ट्राची शान आहेत. हिंदवी स्वराज्याच्या काळात स्वसंरक्षणासाठीरसद गोळा करण्यासाठीशत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी असलेले हे गडकिल्ले. ही शान अबाधित राहावी म्हणून छत्रपती शिवरायांसोबत असंख्य शूरवीर मावळयांनी आपले प्राण पणाला लावले. हे गडकिल्ले जिंकण्यासाठी बाजीप्रभूतानाजी अशा सिंहासारख्या शूरवीरांना वीरगती प्राप्त झाली. तीन-चार शतकांपूर्वी बांधलेले गडकिल्ले अजूनही शाबूत आहेतयावरून त्या वेळच्या भक्कम बांधकामाची व्यवस्थातेव्हाच्या अभियंत्यांच्या कलेचा,कौशल्याचा अंदाज बांधता येईल. हे गडकिल्ले जिंकण्यासाठीटिकविण्यासाठी मावळयांनी वेळप्रसंगी प्राणंाची आहुती दिली. त्यातूनच आपल्याला वैभवशाली इतिहासाचा वारसा मिळाला. मात्र आताचारशे-साडेचारशे वर्षे ऊन-पाऊस-वारा यांचा मारा सहन केल्यामुळे यातील बहुतेक किल्ल्यांचे बुरूज ढासळू लागले आहेत. निव्वळ पर्यटक म्हणून जाणाऱ्यांना वर्षानुवर्षे या किल्ल्यांची दुरवस्था बहुधा कधी कळलीच नसावी. गडकिल्ल्यांवर गेल्यावर किल्ला स्वत:च्या मालकीचा असल्याचा आविर्भाव आणतआपले व आपल्या जोडीदाराचे नाव लिहिणेखाण्यापिण्याच्या वस्तूप्लॅस्टिक बाटल्या गडकिल्ल्यांवर इतरत्र फेकणेअशा गोष्टी करतात.
कधीकाळी बांधलेले हे दुर्ग ढासळल्याने तेथे आता पाहण्यासारखे काही नसेल असेही काही जणांना वाटते. पण हे गडकिल्लेच मराठयांच्या इतिहासाचे गौरवशाली साक्षीदार आहेत. पुढील पिढयांना अभिमानाने सांगाव्या अशा अनेक घटना या किल्ल्यांवर घडल्या आहेत. किल्ल्याचा बालेकिल्लाकिल्ल्याची रचनातिथले तट-बुरूजबुलंद दरवाजेचोरवाटामाचीतिथली देवळे अशा अनेक गोष्टी किल्ल्यांवर जाऊन पाहण्यासारख्या असतात. या किल्ल्यांचा आदर करणारी एक नवी पिढी आपल्याला सध्या पाहायला मिळतेज्यांना हा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या या गडकिल्ल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे. गडकिल्ल्यांचे जतनसंवर्धन करायचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही मंडळी पुरातत्त्व विभागाच्या मदतीने गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेचेपुनर्बांधणीचे काम करीत असतात. गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांना स्वच्छतेचेशिक्षणाचे महत्त्व पटवून देत असतात. हेच गडकिल्ल्यांचे खरे रखवालदार आहेत.
महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढत इतिहासाच्या प्रेमापोटी काही शिवप्रेमीगडप्रेमी मंडळी गडकिल्ल्यांना भेटी देत असतात. तिथे जाऊन स्वच्छतेबद्दल जगजागृतीस्वत: पुढाकार घेऊन साफसफाई करीत असतात. गडकिल्ल्यांची डागडुजीतिथे नियमित साफसफाई केलीव त्यांना पर्यटनस्थळांची मान्यता मिळालीतर अनेक पर्यटक अशा ठिकाणी भेटी देऊ शकतात. बहुतेक गडप्रेमी गट अनेकदा बहुचर्चित गडांना भेटी देत असतात. इतरांना सोबत नेऊन त्या गडासंबधी माहिती देणेसाफसफाईस्वच्छता करणे असे उपक्रम राबविले जात असतात. पण आजही अनेक गडकिल्ले दुर्लक्षित आहेतज्यांच्याबद्दल अनेक जणांना जास्त माहिती नाही.


मुंबईतील 
'दुर्गवीर प्रतिष्ठानया सेवाभावी संस्थेमार्फत अशा दुर्लक्षित गडकिल्ल्यांना वारंवार भेट दिली जाते. गेली आठ वर्षे नियमितपणे दुर्गसंवर्धनाचे काम चालू आहे. माहुली किल्ल्यापासून दुर्गवीरच्या गडप्रेमींनी या कार्यक्रमाला सुरुवात केली. मुंबई-गोवा महामार्गाजवळील माणगावपासून 17-18 कि.मी. अंतरावर असणाऱ्या माणगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानने काम सुरू केले. त्याचबरोबर नागोठण्यापासून ते 10 कि.मी. अंतरावरील खांब या ठिकाणी असलेल्या सुरगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम चालू आहे. मुंबईतील 50, साताऱ्याहून 10 ते 12, कोल्हापूरपुणे या शहरातूनही अनेक मंडळींनी दुर्गवीरच्या चळवळीत आपला सहभाग घेतला. गेल्या सात-आठ महिन्यांपासून दिवेगडसाताऱ्यातील वर्धनगड या ठिकाणीही संस्थेने काम सुरू केले आहे. ''गडकिल्ले संवर्धनासाठी साहित्य संमेलनसांस्कृतिक सण साजरे करतोमहाराष्ट्र दिनानिमित्त इतिहासाला उजाळा देतोकिल्ले संवर्धन करताना किल्ल्याच्या मूळ बांधकामाला हात लागू नयेवेगळे बांधकाम होऊ नये अशा पुरातत्त्व विभागाच्या अटींचे आम्ही पालन करीत असतो. पुरातत्त्व विभागाने गडप्रेमी संस्थांना सोबत घेतलेतर भविष्यात चांगले काम होऊ शकते,'' असे दुर्गवीरचे अजित राणे सांगतात. जमा झालेल्या निधीतून गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांना शैक्षणिक साहित्यही पुरविले जाते. गडकिल्ल्यांवर भेटी देताना काढलेल्या छायाचित्रांचेजुन्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यासाठीही दुर्गवीर संस्था प्रयत्नशील असते.
गडकिल्ल्यांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेचे एक वेगळे वैशिष्टय आहे. एकमेकांशी स्पर्धा न करता या सर्व संस्था एकत्र येऊन शिवकालीन इतिहास टिकविण्याच्यातो इतिहास पुढच्या पिढीत रुजविण्याच्या मोहिमेला हातभार लावतात. 'गडवाटया संस्थेने गडकिल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या वेगवेगळया 22 संस्थांना एकत्र करून रायगडावर महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था असावी अशी मागणी केली. पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने स्वच्छताडागडुजी केली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला. महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी दिवा लावून प्रत्येक सणांची सुरुवात करण्याचा गडवाटचा प्रयत्न असतो,असे सचिव विशाल पेडणेकर सांगतात. प्रत्येक गडकिल्ल्यांवर चौकी पहारा असावायासाठी 'गडवाटनेहमी प्रयत्नशील असते. निव्वळ सहलीसाठी जाणारी असंख्य मंडळी किल्ल्यापर्यंत गाडया नेऊन दारूच्या पाटर्या करतात. यासाठी येथे स्थानिक रहिवाशांनी चौकी उभारावी यासाठी 'गडवाट'चे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. किल्ल्यांवर येणाऱ्या गाडयांची पाहणी करून मद्य नेण्यास बंदी केलीतरच गडकिल्ल्यांवर सहलीसाठी येणाऱ्या मंडळींवर जरब बसू शकते. आपल्याला कोणी बोलणारे नाही म्हणून गडकिल्ल्यांवर सररास पाटर्या केल्या जातातयाला वेळीच आळा बसला पाहिजे. संस्थेमार्फत 

अनेक मंडळींना सोबत नेऊन त्या गडकिल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले जाते. गडवाटच्या सुरुवातीच्या दिवसात ठरावीक पाच ते सात किल्ल्यांना भेटी द्यायचे ठरविले होते. त्याप्रमाणे कार्यक्रमाचा एक भाग व इतरांना सोबत घेता यावे म्हणून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती टाकण्यात आली. याला सर्व ठिकाणांहून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईपुणेनाशिकसातारा अशा शहरांतून गडप्रेमी सहभागी झाले. स्थानिकांना सोबत घेऊन राजगड पाली दरवाजाच्या निखळलेल्या पायऱ्या मातीने भरून काढत गडसंवर्धनाची मोहीम गडवाटने यशस्वीपणे राबविली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात राहणाऱ्या संतोष माने यांनी गडसंवर्धनासाठी 'गनिमी कावाया ग्रूपची स्थापना केली आहे. वेगवेगळया ग्रूप्सशी संलग् राहणाऱ्या संतोष यांनी इतिहासाचा वारसा असणाऱ्या पन्हाळयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या 13 मित्रांना घेऊन सात वर्षांपूर्वी 'गनिमी कावाया संस्थेची सुरुवात केली. एखाद्या ठिकाणी जाऊन इतिहासाबद्दल जागृती करणेलोकांमध्ये गडकिल्ल्यांबद्दल आत्मीयता निर्माण करणे अशी कामे गनिमी कावामार्फत केली जात असतात. जनतेला आपल्या इतिहासाची थोरवी आपण सांगू शकलोत्याचे महत्त्व उलगडून दाखवू शकलो तर ते गडकिल्ल्यांकडे वळतील व त्यांचे संवर्धन करतील या जाणिवेतून गनिमी कावाचे काम सातत्याने चालत आहे. पन्हाळगडपावनखिंडविशालगडदुर्लक्षित असलेला मुठागड या किल्ल्यांवर त्यांनी आतापर्यंत विशेष मोहीम राबविली आहे. आजही काही किल्ल्यांची शासनदरबारी नोंद नाही. त्यांची नोंद झाली तरच त्यासाठी निधी मिळू शकतो व किल्ल्याच्या विकासासाठीची कामे होऊ शकतात. पुरातत्त्व विभागाला कायद्याच्या चौकटीत राहून सर्व कामे करावी लागतात. पुरातत्त्व विभागासोबत राहूनखास लक्ष देऊन सुरळीत कामे होऊ शकतात असा काही गडप्रेमींचा अनुभव आहे. गडकिल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना दुर्गसंवर्धनाबद्दल प्रबोधन व्हावेया उद्देशाने 'दुर्गसखाया संस्थेची स्थापना केली गेली. मकरंद केतकरमनोज चव्हाणअभिजित काळेचेतन राजगुरूसुबोध पाठक ही मंडळी दुर्गसखामार्फत प्रबोधनाचे काम यशस्वीरित्या करीत आहेत. संस्थेतर्फे दर वर्षी 'दुर्गअभ्यास भ्रमणआयोजित केले जाते. त्या कार्यक्रमादरम्यान गडावर हिंडताना इतिहास अभ्यासक सभासदांना दुर्गांची बलस्थाने व दुर्गांचा इतिहास उलगडून दाखवितात आणि प्रश्नोत्तरादरम्यान शंकांचे निरसन केले जाते. त्या कार्यक्रमाद्वारे राजगडरायगडपुरंदरप्रतापगडशिवनेरी-नाणेघाटसुधागड अशा दुर्गांचा अभ्यास केला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेगवेगळया आदिवासी पाडयांवरील शाळांमधून शिक्षण घेणारी गुणी आदिवासी मुले साक्षरेतेसोबत सुसंस्कृतही व्हावीम्हणून 'दुर्गसखात्या मुलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवीत असतात. त्यामध्ये पाडयांपासून शाळेपर्यंतच्या प्रवासासाठी सायकलीबौध्दिक विकासासाठी शैक्षणिक सीडी आणि दूरदर्शन संचसंगणक साक्षरतेसाठी काही निवडक शाळांमध्ये संगणकविद्यार्थी दत्तक योजनासुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप,दिवाळीत फराळ आणि फटाके यांचे वाटपगावकऱ्यांच्या आग्रहाखातर ग्रंथालयगरजूंना कपडेवाटप अशी अनेक समाजपयोगी कामे दुर्गसखामार्फत केली जात असतात.
शिवजयंतीप्रमाणेच राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करणाऱ्याही काही संस्था आहेत. शिवअस्मिता या सामाजिक शिवप्रेमी संस्थेमार्फत राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. राजमाता जन्मोत्सव साजरा करण्याचे संस्थेचे हे दुसरे वर्ष. यंदाही या संस्थेमार्फत राजमातांचा जन्मदिन किल्ले कोरीगडावर मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जानेवारी रोजी मुंबईहून कोरीगडाकडे जाण्यासाठी शिवअस्मिता संस्था मार्गक्रमण करणार आहे. या निमित्त गडावरील मंदिरांची साफसफाई,सुशोभीकरण तसेच मंदिराच्या आवारातील परिसरात रांगोळीची आरास करून राजमाता जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
किल्ल्यांची जपणूक व संवर्धन करताना प्राचीन लेण्यांची जपणूक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी डोंबिवलीतील पंकज समेळ या तरुणाने लेण्यांवर खास अभ्यास सुरू केलाआहे. 2006 साली सह्याद्री भ्रमण ग्रूपने राजगडरायगड या किल्ल्यांवर जाऊन साफसफाईचा उपक्रम सुरू केला. गडकिल्ल्यांबाबत सध्या अनेक संस्था जागरूक झाल्या आहेत. अशा वेळी लेण्यांकडे लक्ष द्यावे म्हणून पंकजने आपला मोर्चा लेण्यांकडे वळविला. लेणी आणि किल्ले एकमेकांचा परस्पर संबध सांगत असतात. पुरातन काळातील लोकांचे राहणीमानआभूषणे हे शिल्पात रेखाटण्याची कला वाखाणण्याजोगी आहे. यासाठी अभ्यासवर्ग घेऊन लेण्यांचे माहात्म्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा पंकजचा मानस आहे.

या ऐतिहासिक वास्तूंची जपणूक झालीस्थानिक याबाबत जागरूक झालेतर पर्यटन मार्गदर्शकस्थानिक दुकानदार यांना यातून रोजगार मिळू शकेल. गडांवरील कचराअस्वच्छता ही गंभीर समस्या होत आहे. पुरात्तत्व विभागाच्या कालबाह्य अटींचा फेरविचार व्हायला हवा. असे झाले तर स्वयंसेवी संस्थांना गडसंवर्धनाचे काम सजगतेने करता येईल. पर्यटकांनी गडकिल्ल्यांवर स्वच्छता ठेवायला हवीमंदिराप्रमाणे गडाचे पावित्र्य जपायला हवे. बहुतांश किल्ल्यांची पडझड झालेली सध्या दिसून येते व त्याकडे पुरातत्त्व विभागाचे झालेले दुर्लक्षही तेवढेच कारणीभूत आहेअसे काही गडप्रेमींचे गाऱ्हाणे असते. पण एखादी ऐतिहासिक वास्तू दुरुस्त करायची असेल तर ती वास्तू कोणत्या कालखंडात बांधली आहेत्याच्या जतनासाठी कोणत्या प्रकारचे बांधकाम योग्य असेल याचा सारासार विचार करणे ही तितकेच गरजेचे आहेअसे मत ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि पुरातत्त्व विभागाचे निवृत्त संचालक अरविंद जामखेडकर यांनी व्यक्त केले. स्मारक दत्तक
योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्था अशी कामे करू शकतात. काही किल्ल्यांसाठी लागणारा निधी केंद्रातून येत असतो
तर काही किल्ल्यांवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. एखाद्या वास्तूच्या डागडुजीसाठी व पुनर्बांधणीसाठी लागणारा निधी विशिष्ट खात्यात जमा करुन त्यावर संबंधित विभाग काम करतो किंवास्थापत्य विभागाकडे हे काम सोपविले जाते. सरकारस्थानिक माणसे काय करतात यापेक्षा आम्ही वेळात वेळ काढून गडकिल्ल्यांना भेटी देऊन तिथे स्वच्छताडागडुजी करतोअसे सामाजिक संस्थांचे सांगणे आहे. पुरातत्त्व विभागाने अशा सेवाभावी मंडळींची मदत घेत कार्य चालू ठेवलेतर या ऐतिहासिक वास्तूंची आपल्याला जपणूक करता येईल.
9773770507

एखादी ऐतिहासिक वास्तू दुरुस्त करायची असेल तर ती वास्तू कोणत्या कालखंडात बांधली आहेत्याच्या जतनासाठी कोणत्या प्रकारचे बांधकाम योग्य असेल याचा सारासार विचार करणेही तितकेच गरजेचे आहे. एखाद्या वास्तूच्या डागडुजी व पुनर्बांधणीसाठी लागणारा निधी विशिष्ट खात्यात जमा करून त्यावर संबंधित विभाग काम करतो किंवास्थापत्य विभागाकडे हे काम सोपविले जाते.
अरविंद जामखेडकर (ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि पुरातत्त्व विभागाचे निवृत्त संचालक)

Monday, 3 November 2014

एमडी महाविद्यालयाची 'स्वप्नपूर्ती'

*****प्रवीण दाभोळकर*****


चार वर्षांपूर्वी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात त्या वेळी शिकणारे प्रवीण भिकले व प्रशांत माने या समाजसेवेची आवड असणाऱ्या तरुणांनी प्रकल्पाला सुरूवात केली. दर रविवारी पदपथावर राहणाऱ्या मुलांना परळच्या एम.डी. महाविद्यालयात आणायचे आणि शिकवायचे हा यामागचा उद्देश होता. चिमुरडयांच्या स्वप्नांना नवे पंख मिळावे म्हणून या प्रकल्पाला'स्वप्नपूर्तीहे नाव दिले गेले. 2010 साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'स्वप्नपूर्तीया प्रकल्पाचा शुभारंभ झाला. सध्या 'स्वप्नपूर्तीया प्रकल्पाला चार वर्षे उलटून गेली आहेत. या प्रकल्पामध्ये शिवडीलालबाग-परळ या विभागातील झोपडपट्टीतील मुलांना सहभागी करून घेतले आहे. महानगरपालिकेच्या शाळेत काही मुलांची नावे नोंदवण्यात आली आहेत. अगोदर शिकत असलेल्या मुलांच्या प्रगतीविषयी वारंवार माहिती घेतली जाते. या अनोख्या,आगळयावेगळया प्रकल्पाला अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत.
मुंबईत रस्त्याने प्रवास करताना प्रत्येक सिग्नलवर लहान मुले भीक मागताना दिसतात. अशा वेळी त्या लहान मुलांना कोणी शाळेचे-शिक्षणाचे महत्त्व सांगितलेतर ते ऐकण्याच्या मानसिकतेत मुळीच नसतात. काही दिवसांपूर्वीच परळ नाक्याच्या सिग्नलवर सलीम नावाचा 8-9 वर्षाचा एक मुलगा भीक मागत होता. त्याची विचारपूस केल्यावर कळले की वांद्रयाच्या झोपडपट्टीत तो राहतो व रोज तिथून इथे भीक मागायला येतो. त्याला कोणी इथे पाठवलेघरातले कुठे असतात अशी माहिती सांगणे तो जाणीवपूर्वक टाळत होता. शिक्षणाबद्दल काही ऐकून घेण्याची त्याची इच्छाच नव्हती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात रहदारीच्या सगळयाच रस्त्यांवर काही लहान मुले भीक मागताना आपल्याला सररास दिसतात. रस्त्यावरच्या या लहान मुलांचे आयुष्य आणि शिक्षणाची स्थिती गंभीर आहेहे वास्तव नाकारता येत नाही.

चार वर्षांपूर्वी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात त्या वेळी शिकणारे प्रवीण भिकले व प्रशांत माने या तरुण विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड होती. रस्त्यावरच्या मुलांना अक्षरओळख करून देण्याची संकल्पना दोघांच्या मनात आली. काळाचौकीला पदपथावर अशी झोपडपट्टी आहे, असे महाविद्यालयातील मैत्रीण धनश्री माने हिने त्यांना सांगितले. दररोज महाविद्यालयात जाताना वाटेवर दिसणारी अशी मुले त्यांचे नेहमी लक्ष वेधून घ्यायची. प्रवीण आणि प्रशांत यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवायचे ठरवले. काळाचौकी पोलीस ठाण्याजवळील श्रावण यशवंते चौकात गेल्या काही वर्षांपासून काही कुटुंबे झोपडयांमध्ये राहतातहे त्यांनी पाहिले. भंगाराच्या बदल्यात लसूण विकणे हा इथल्या स्त्रियांचा प्रमुख व्यवसाय. दारू पिणाऱ्या नवऱ्यांमुळे संध्याकाळी घरी रोज भांडणमारझोड हे ठरलेलेच. पदपथावरचा महानगरपालिकेचा दिवा हाच त्यांच्यासाठी प्रकाशाचा काय तो एकमेव स्रोत. या झोपडयांमध्ये मिळून पंधरा वर्षाखालची जवळजवळ 10 ते 12 मुले आहेत. त्यातील काही जण जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत जाततर उरलेली मुले नुसत्याच उनाडक्या करीत असत. मग कधी त्यांच्या आईसोबत खांद्यावर पिशवी टाकून लसूण विकायला जायचेतिथेच कोणी काय देईल ते खायचेतर कधी दिवसभर भटकत राहायचे. जवळ कुठे जत्रा असेल तर घोळक्याने जत्रेत जायचेफिरायचेकोणाकडे तरी खायला मागायचे आणि जिवाची मुंबई करायची. सर्वसाधारण घरात शिकणाऱ्या मुलांपेक्षा अनेक कला यांना अवगत असतात. रस्ता कसा पार करायचा हे इतर मुलांना शिकवावे लागतेपण पदपथावरच्या या मुलांना याची एवढी सवय झालेली असते की गाडया चुकवत चुकवत गाडीचा वेग पकडून ते सराईतपणे रस्ता पार करीत असतात. चेहरा केविलवाणा करून खायला मागायचीबऱ्याचदा आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची अजब कला त्यांच्यामध्ये दिसून येते. वरकरणी साधीसरळ दिसणारी ही मुले बेरक्या वृत्तीची होती. यांची दिनचर्या आणि ते नेमके कुठे राहतातकाय करतात याची माहिती काढण्यासाठी त्यांनी मुलांवर पाळत ठेवली. खाण्याचे आमिष दाखवूनही ही मुले शिक्षण घ्यायला तयार होणारी नव्हतीअसे त्यांच्या निदर्शनास आले. समोरच्याकडून खायचे काढून घेऊन त्यांच्या हातावर तुरी देऊन पळण्यात ते पटाईत होते.
या मुलांना शिकवायचे असेलतर त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची गरज होती. काही वाईट सवयी असल्या तरी मुलांमध्ये शिक्षणाबद्दल उदासीनता आहेअसे प्रवीण व प्रशांत यांना कधीच वाटले नाही. अखेर मुलांच्या पालकांना जाऊन समजवायचे ठरले. पालकांना भेटून या विद्यार्थ्यांना अनपेक्षित धक्का बसला. मुलांना कितीही शिकवले तरी त्यांना भीकच मागावी लागणार आहेअशी त्या पालकांची मानसिकता पाहायला मिळाली. पण मुले जर शिकली तर स्वत:च्या पायावर उभी राहू शकतीलस्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकतील हे समजावताना विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ यायचे. दारूमुळे तर्राट झालेल्या मुलांच्या वडिलांनी या शिक्षणाला नकार दिलापण कोणीतरी चांगली शिकलेली मुले काहीतरी चांगले सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असे त्या मुलांच्या आयांना वाटायला लागले. त्यांनी सहकार्याची भावना दाखवली. फक्त एकदा भेटूनविचारपूस करून हा प्रश्न मार्गी लागणारा नव्हता. अखेर हे शिवधनुष्य पेलायचे ठरलेच. प्रवीणप्रशांत यांच्यासोबत धनश्री माने व आणखी काही मित्रमंडळी या ध्येयपूर्तीसाठी कामाला लागली. वेळ मिळेल तसा यांच्या झोपडीत जाऊन विचारपूस करू लागली. पदपथावर मुलांच्या मांडीला मांडी लावून बसू लागली. धनश्री माने ही विद्यार्थिनी शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांच्या पाठयपुस्तकातला अभ्यासक्रम शिकवू लागली. प्रत्येक मुलाला नावाने ओळखू लागली. शाळेत न जाणारी व दिवसभर उनाडक्या करणारी शेजारची मुलेसुध्दा, 'ही काय नवी भानगड?' म्हणून येऊन बाजूला बसू लागली. असे अनेक दिवस गेले. येणारी-जाणारी माणसेबसची वाट बघणारी माणसे एक उत्सुकता म्हणून पाहत व निघून जात असत. इतर मुलांसारखे शिकवणी वर्ग या मुलांकडे नसल्याने मुलांनाही नवीन माणसाकडून काहीतरी शिकल्याचा आनंद मिळत होता. काही सुशिक्षित मुले आपल्या लेकरांना काहीतरी चांगले शिकवण्याचा प्रयत्न करत आहेतहे एव्हाना त्यांच्या पालकांना समजू लागले होते. पालकही आता मनमोकळेपणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागले होते. पण या सगळया प्रकल्पात प्रवीण आणि प्रशांत यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. महाविद्यालयातला स्वत:चा अभ्यासघरातील कामेत्यात झोपडीमध्ये संध्याकाळी विजेची असलेली समस्याआजूबाजूची वर्दळ यामुळे मुलांना शिकवणे प्रवीणप्रशांत यांना थोडे कठीण वाटू लागले. यासाठी अपल्या मित्रमंडळींचीही मदत घेतली जाऊ शकतेअसा त्यांनी विचार केला. एम.डी. महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभाग वेगवेगळया सामाजिक उपक्रमांमुळे चांगलाच चर्चेत होता. सर्वांच्या सहकार्याने मुलांना शिकवण्याचे हे काम रा.से.यो.अंतर्गत स्वतंत्र प्रकल्प म्हणून पुढेदेखील सुरू ठेवण्याचा निश्चय केला. महाविद्यालयात मुलांना शिकवण्याच्या या प्रकल्पाला परवानगी मिळवण्यासाठी रा.से.यो.चे प्रा.डॉ.अविनाश कारंडे सर यांनी प्राचार्य घुले मॅडम यांच्याकडे मदत मागितली. प्राचार्यांनीही कोणतीही हरकत न घेता विद्यार्थ्यांच्या जबाबदारीवर या मुलांना महाविद्यालयात आणून शिकवण्याची परवानगी दिली.
काळाचौकी येथील झोपडपट्टीतील व आजूबाजूच्या परिसरातील दहा मुलांना नियमित शिकवायचेअसे ठरले. रा.से.यो.चे ठरावीक वीस विद्यार्थी या प्रकल्पावर काम करणार होते. पाच-पाचच्या गटाने दर रविवारी या मुलांना महाविद्यालयात आणायचे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच एखादी वस्तू बनवणेनृत्यसंगीतचित्रकला शिकवणे असे उपक्रम सुरू झाले. रस्त्यावरील या मुलांना अनेक वाईट सवयी होत्या. त्यातून त्यांना बाहेर काढणे मोठया जिकिरीचे काम होते.
दर रविवारी मुलांना परळला एम.डी. महाविद्यालयात आणले जायचे आणि शिकवले जायचे. चिमुरडयांच्या स्वप्नांना नवे पंख मिळावे म्हणून या प्रकल्पाला 'स्वप्नपूर्तीहे नाव दिले गेले. 2010 साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'स्वप्नपूर्तीया प्रकल्पाचा शुभारंभ झाला. त्या दिवशी शाळेत जाणारी मुले आपापल्या शालेय गणवेशासह महाविद्यालयात हजर झाली. महाविद्यालयात शिस्तीचे पालन करावे लागेलअसे त्यांना आधीच सांगितले गेले होते. सुरुवातीला काही क्षण कावऱ्याबावऱ्या नजरेने बघणारी ही मुले लगेच बोलती झाली. एकदा सांगितल्यावर पटापट आपल्या आवडीचे गाणे,अभिनय करून महाविद्यालयातील मुलांवर आपली छाप पाडत होते. गणेश नावाच्या मुलाने तर अमिताभ बच्चनसनी देओल अशा अभिनेत्यांची हुबेहूब नक्कल करत सर्वांना स्वत:च्या प्रेमात पाडले. विद्यार्थीही आ वासून हा सर्व प्रकार पाहायला लागले. मुलांना शिकवण्याची त्यांची उत्सुकता आणखी वाढू लागली. 'तुम्हाला काय व्हायचेय?' या प्रश्नावर अभिनेताडॉक्टरशिक्षक अशी उत्तरे मिळत होती. या मुलांची स्वप्ने पाहून या मुलांना शक्य तेवढी मदत करायचीअसे त्या दिवशी महाविद्यालयातील मुलांनीही ठरवले. मुले टॅक्सीतून उतरल्यावर त्यांना वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी शिपाईवर्गातला गावकर मामाही विद्यार्थ्यांना मदत करू लागला. मुलांनी नियमित यावेयासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची,वह्यापुस्तकांची व्यवस्था केली. चांगले खायला मिळतेखेळायला मिळते म्हणून शाळेत न जाणारी बाकीची मुलेही येऊ लागली. आता स्वप्नपूर्ती प्रकल्पामध्ये एकूण वीस मुले-मुली येऊ लागली होती. एखाद्या रविवारी राणीबागेत किंवा जवळच्या नरेपार्क उद्यानात मुलांना खेळायला घेऊन जायचे. शिव्या देणे आणि मस्ती करणे यावर वचक बसणे गरजेचे होते. मग मुलांनीच एकमेकांवर लक्ष ठेवूनअजूनही कोण कोण शिव्या देतात त्यांची नावे रविवारी दादा-ताईंना सांगायची असे ठरले. मस्ती करणाऱ्यांना शिक्षा म्हणून एखादा रविवारी महाविद्यालयात आणायचेच नाहीमग पुढच्या रविवारी तो आपोआप शांत झालेला असायचा. अशा तऱ्हेने शिव्या आणि मस्ती आटोक्यात आणण्यात विद्यार्थ्यांना काही प्रमाणात यश आले.
आपल्या खिशातून रोज एक रुपयाची बचत करून या प्रकल्पासाठी निधी साठवायचाअसे रा.से.यो.च्या विद्यार्थ्यांनी ठरवले. तरीही जमा होणारी रक्कम अपुरी होती. मग महाविद्यालयातील इतर विषयांच्या प्राध्यापकांचे लेक्चर संपल्यावर त्यांना या प्रकल्पाबद्दल सांगायचे आणि शक्य तेवढया मदतीचे आवाहन करायचेअसे ठरवून मुले लेक्चरला बसायला लागली. शिक्षकांना आपले म्हणणे पटवून द्यायला लागली. फक्त शिकण्यासाठी म्हणूनच महाविद्यालयात येणारी ही मुले नाहीततर आपल्यासोबत इतरांनीही शिकावे याची यांना जाणीव आहेम्हणून इतर प्राध्यापकांनीही या प्रकल्पाला शक्य तेवढी मदत केली. स्वप्नपूर्तीच्या विद्यार्थ्यांना या मुलांकडूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. या प्रकल्पात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांवर सर्व प्राध्यापकांची विशेष नजर होतीज्यामुळे आपोआपच त्यांचा अभ्यासही होत गेला. स्वप्नपूर्ती प्रकल्पाची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. कॉलेज कँटीनकट्टा यांवर स्वप्नपूर्तीची चर्चा होऊ लागली. काही जण प्रोत्साहन द्यायचेतर बरेच जण टिंगलही करायचे. मग 'रविवारी फिरणेमज्जा करणेसिनेमा बघणे यात वेळ न घालवता समाजसेवेसाठी तो वेळ देतोअसे स्वप्नपूर्तीचे कार्यकर्ते टिंगल करणाऱ्यांना सांगू लागले.

'स्वप्नपूर्तीया प्रकल्पाला चार वर्षे उलटून गेली आहेत. या प्रकल्पामध्ये शिवडीलालबाग-परळ या विभागातील झोपडपट्टीतील मुलांना सहभागी करून घेतले आहे. या प्रकल्पाची सुरुवात करणारा प्रवीण आता तामिळनाडूमध्येतर प्रशांत आसाममध्ये सेवाभावी संस्थेसाठी काम करत आहेत. फोनवरून,सामाज माध्यमांद्वारे स्वप्नपूर्ती प्रकल्पाविषयीची माहिती त्यांना मिळत असते. ती माहिती ऐकून नव्या विद्यार्थ्यांचे ते भरभरून कौतुक करतात. त्यांनी लावलेले हे बीज हळूहळू मोठे होत आहेयाचे त्यांना नेहमी समाधान वाटते. हितेश आखाडे हा रा.से.यो. स्वयंसेवक इतर स्वयंसेवकांच्या सोबतीने सध्या स्वप्नपूर्ती प्रकल्प सांभाळत आहे. बाबासाहेब भोसलेहर्षदा गलांडेवैष्णवी चव्हाणसौरभ गाडगेगणेश पवार अशी अनेक मुले दर रविवारी न चुकता एम.डी. महाविद्यालयात येतात.''आम्ही मुलांना काय शिकवतो त्यापेक्षा बऱ्याच चांगल्या गोष्टी मुलांकडून आम्हाला शिकायला मिळतातआम्हाला आमचे बालपण नव्याने जगायला मिळते'' असे प्रकल्प प्रमुख हितेश आखाडे सांगतो. काळाचौकीच्या महानगरपालिकेच्या शाळेत काही मुलांची नावे नोंदवण्यात आली आहेत. अगोदर शिकत असलेल्या मुलांच्या प्रगतीविषयी वारंवार माहिती घेतली जाते. या अनोख्याआगळयावेगळया प्रकल्पाला अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत.
एम.डी. महाविद्यालयाप्रमाणेच इतर महाविद्यालयात व काही रहिवासी इमारतींमध्येही असे प्रकल्प सुरू झाले आहेत. देशभरातीलतसेच मुंबईसारख्या शहरातील अनेक मुलांना शिक्षण घेणे शक्य नसते. आजच्या घडीला अनेक मोठमोठया संस्था बालमजूरबालहक्क अशा गंभीर विषयांवर काम करताना दिसतातज्यांना पुरेसा निधी उपलब्ध होतो. मात्र स्वप्नपूर्तीसारखा प्रकल्प आजही विद्यार्थ्यांच्या खिशातील पैशातूनच चालत असतो. पण सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या विद्यार्थ्यांना मुलांना शिकवण्यातच आनंद मिळतो. स्वप्नपूर्ती प्रकल्पात काम करणारे अनेक विद्यार्थी आजही आजूबाजूच्या परिसरात भीक मागणाऱ्या मुलांना ''कुठे राहतोसतुला शिकायला आवडेल का?'' असे विचारत असतात.
9773770507

Monday, 22 September 2014

‘राइट टु पी’… चळवळ स्वच्छतागृहांसाठी

*****प्रवीण दाभोळकर*****
सध्या मुंबई शहरात महिलांच्या सुरक्षिततेइतकीच स्वच्छतागृहांचीही  तेवढीच गरज निर्माण झाली आहे. महिला स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी आहे, असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्थाही दयनीय आहे. ‘राइट टु पी’ ही संघटना गेली तीन वर्षे शासनदरबारी या मागणीचा पाठपुरावा करीत आहे.  याअंतर्गत सध्या 32 सामाजिक संस्था या कामासाठी एकत्र आल्या आहेत. प्रशासनाला या समस्येचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी आंदोलने, निदर्शने करण्यात आली, प्रत्येक रेल्वे स्थानकावर सह्यांची मोहीम राबवण्यात आली. महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित व मोफत स्वच्छतागृह हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे, त्यानुसार ध्येयपूर्तीसाठी अखंडपणे हे कार्य चालू आहे.
मुंबईच्या उपनगरांतून आणि त्याला लागून असलेल्या शहरांमधून अर्ध्याहून अधिक महिला/मुली शिक्षणासाठी, कामानिमित्त रोज घरातून बाहेर पडत असतात. सुरक्षिततेसोबतच प्रवासादरम्यान सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या कमतरतेसारख्या गंभीर समस्येला त्यांना रोजच्या रोज सामोरे जावे लागते आहे. देशाची आर्थिक महासत्ता असलेल्या मुंबई नगरीत महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहांची खूपच कमी संख्या ही खेदाची बाब आहे. यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी वेळोवेळी आवाज उठवला. पण प्रशासनाच्या आडमुठेपणापुढे त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे अधिक त्वेषाने पेटून उठत, नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृह उपलब्ध असण्याचा अधिकार म्हणजेच ‘राइट टु पी’ या मोहिमेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी एक चळवळ उभी राहिली. परिपत्रके, निवेदने, आंदोलने अशा माध्यमातून हा लढा चालू आहे. महिलांना स्वच्छ, सुरक्षित, मोफत व सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था असणे हे या चळवळीचे उद्दिष्ट आहे. ज्यावर उघडपणे बोलायला वा चर्चा करायला सर्वसामान्य स्त्रीला – मग ती शहरातली उच्चशिक्षित असो वा अल्पशिक्षित वा ग्रामीण भागात राहणारी असो – संकोच वाटत असे, असा हा विषय. मात्र तो प्रश्न थेट स्त्री आरोग्याशी संबंधित आहे. तेव्हा परंपरेने चालत आलेले सामाजिक संकेत, संकोच दूर सारून, या विषयावर उघडपणे चर्चा सुरू करून जनजागृती करणे ही आजच्या काळातली एक महत्त्वाची गरज आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन, मुंबईतल्या 32 सामाजिक संस्था ‘राइट टु पी’ या मोहिमेसाठी एकत्र आल्या आहेत, ही स्वागतार्ह बाब म्हणायला हवी.
स्वच्छतागृहांची गंभीर समस्या
1507180_662544790507830_743हा प्रश्न किती गंभीर आहे आणि त्याची व्याप्ती किती आहे, हे समजून घेण्यासाठी सामाजिक संघटनांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मिळवली. त्यात मिळालेल्या माहितीवरून, मुंबई शहरात महिलांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन व देखरेख करण्याकरिता वेगळी व्यवस्था नाही, हे उघडकीस आले. ‘राइट टु पी’- अर्थात लघवीसारख्या नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृह उपलब्ध असण्याचा अधिकार, या अंतर्गत मुंबईतील वेगवेगळया सहा वॉर्डांमध्ये दादर, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, चेंबूर व घाटकोपर या उपनगरांतील एकूण 129 स्वच्छतागृहांतील महिलांसाठी उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांचे एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून असे लक्षात आले की, ही सुविधा मोफत उपलब्ध असूनही स्वच्छतागृहात तसे स्पष्ट फलक लावलेले दिसत नाहीत. त्यामुळे तिथले व्यवस्थापक महिलांकडून पैसे आकारतात. ”हे स्वच्छतागृह फक्त शौचाला जाण्यासाठी उपलब्ध आहे” असे सांगत, त्यांचा मुतारी म्हणून वापर करायला व्यवस्थापक नकार देतात किंवा त्यासाठी पैसे उकळतात. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची – म्हणजे ‘युरिनल’गरज आहे. ”तुम्ही आत जाऊन नक्की काय करता ते आम्हांला कसं समजणार? तेव्हा पैसे द्यावे लागतील” अशा भाषेत बोलत महिलांकडून पैसे उकळले जातात. स्वच्छतागृहांमध्ये जमा झालेल्या रकमेपैकी काही रक्कम महानगरपालिकेला द्यावी लागते, पण पैसे भरल्याची कोणतीही पावती या मंडळींकडे नसते. मुंबईतील महिलांच्या स्वच्छतागृहांची अवस्था फारच दयनीय आहे. कमी संख्येने असलेली ही स्वच्छतागृहे खूपच अस्वच्छ असतात. त्यामुळे खूप दुर्गंधी पसरलेली असते. स्वच्छतागृहांची पुरेशी सोय नसल्याने, घरातून निघताना फारसे पाणी न पिता – म्हणजे लघवी लागणार नाही याची काळजी घेत अनेक जणींना रोजचा प्रवास करावा लागतो, हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे.
प्रसारमाध्यमांचा पाठिंबा
251231_456781937707379_8849वर्तमानपत्रांतून, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून तसेच सोशल माध्यमांवरूनही या चळवळीला पाठिंबा, समर्थन मिळत आहे. या संदर्भात, सोळा रेल्वे स्थानकांवर सह्यांची मोहीम राबवली गेली. पन्नास हजार लोकांनी स्वाक्षरी करून या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. पथनाटयाद्वारे जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली. ‘राइट टु पी’ने वेळोवेळी केलेला पाठपुरावा, आंदोलने, निदर्शने, त्याला प्रसारमाध्यमांनी दिलेली योग्य प्रसिध्दी यामुळे महिलांच्या स्वच्छतागृहांकडे झालेल्या दुर्लक्षाकडे प्रशासनाने लक्ष द्यायला सुरुवात केली. 2011 साली महिला स्वच्छतागृहांसाठीच्या मागण्यांच्या परिपत्रकानुसार सार्वजनिक स्वच्छतागृहांचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, मलनि:सारण व सेप्टिक टँक नियमित साफ करण्यात यावे, शौचालयासंबंधीची संपूर्ण माहिती – व्यवस्थापन करणारी संस्था कोणती आहे, तिचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक हा सर्व तपशील – दर्शनी भागात लावण्याचा नियम परिपत्रकाद्वारे करण्यात नगरनियोजनात हा मुद्दा प्राधान्याने घेण्यात आला. मुंबईत गर्दीच्या ठिकाणी महिलांकरिता स्वच्छतागृहे व प्रसाधनगृहे बांधण्यासाठी प्रशासनाने 2012 व 2013 या कालावधीत 75 लाखांची, तर यंदाच्या वर्षी 1 कोटी एवढी तरतूद केलीआहे. मात्र कागदावर एवढी मोठी संख्या दिसत असली, तरीही प्रत्यक्षात तेवढया किंमतीची कामे झाल्याचे दिसत नाही. विकलांग महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावे, महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये पुरुष व्यवस्थापकाची नेमणूक न करता फक्त स्त्री कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करावी, सुरक्षेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, महिला बचत गटांना अशा कामामध्ये प्राधान्य द्यावे, अशा मागण्या ‘राइट टु पी’ ने महानगरपालिकेसमोर ठेवल्या आहेत.
आगळेवेगळे रक्षाबंधन
rakshabndhanनारळी पौर्णिमेचे औचित्य साधून, महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांसोबत ‘राइट टु पी’च्या महिला कार्यकर्त्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. स्त्री-पुरुषांचे चित्र असलेल्या राख्या त्यासाठी बनवल्या गेल्या. यातून, ‘महिलांच्या स्वच्छतागृहांच्या बाबतीत भेदभाव, असंवेदनशीलता नको’ असा संदेश राइट टू पी च्या कार्यकर्त्यांना द्यायचा होता. म्हणून सर्व अधिकाऱ्यांना निषेधाचे प्रतीक म्हणून राख्या बांधल्या गेल्या व लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासनही घेण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहाच्या समस्या निवारणासाठी एक विशेष समिती असावी, ज्यामध्ये राइट टु पीचे व महानगरपालिकेचे प्रत्येकी पाच अधिकारी असतील, जे या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवतील, असे ठरवण्यात आले. जी काही मोजकी स्वच्छतागृहे आहेत त्यांची साफसफाई प्रथम करा, ती सुरक्षित करा; त्याचबरोबर नवीन स्वच्छतागृहांची मागणीही पूर्ण करा अशा मागण्या ‘राइट टु पी’तर्फे ठेवण्यात आल्याचे या संस्थेच्या सुप्रिया सोनार यांनी सांगितले.
तरीही ठोस कारवाई नाहीच..
महानगरपालिकेकडे वारंवार निवेदने करूनही मुंबईतील महिलांच्या स्वच्छतागृहांच्या बाबतीत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. हा लढा महानगरपालिकेच्या कोण्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नाही, तर असंवेदनशील प्रवृत्तींच्या विरोधात हा लढा आहे. फक्त आंदोलन करून अशा समस्या मार्गी लागत नसतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या मदतीने प्रशासनावर अंकुश ठेवत, सर्वांना या मोहिमेत सामील करत हा प्रवास चालू आहे. फक्त ‘राइट टु पी’ या स्वयंसेवी संस्थेतील महिलांचीच ही समस्या नसून कामानिमित्त घरातून बाहेर पडणाऱ्या मुंबईतील प्रत्येकीला भेडसावणारी ही समस्या आहे. स्वच्छतागृहांमधली दर्ुव्यवस्था आणि त्यातून होणारा मानसिक त्रास यांच्याविरुध्दही हा लढा आहे. चूल-मूल सांभाळणाऱ्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात, तशा आपल्या नैसर्गिक गरजा पूर्ण करण्याकरिता न्याय्य मार्गाने लढूही शकतात, हे ‘राइट टु पी’ चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सिध्द केले आहे.
9773770507

1000 ठिकाणी ‘पे ऍंड यूज’ स्वच्छतागृहे बांधली आहेत, जी पूर्वीपासूनच आहेत. पण तेवढयाने आंदोलनकर्त्यांचे समाधान होत नाही. सुधारणेची गरज असेल तर नक्की सुधारणा करू.
- प्रकाश पाटील
सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन,
बृहन्मुंबई महानगरपालिका

स्वच्छतागृहांची व्यवस्था जवळपास नसेल, तर अशा वेळी स्त्रिया/मुली बऱ्याचदा पाणी पिणे टाळतात. त्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशा मानसिकतेतल्या महिला सल्ल्यासाठी येत असतात, ज्यांच्यामध्ये मूतखडा होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असते. तसेच फंगल इन्फेक्शनने ग्रासलेल्यांची संख्याही वाढलेली दिसते.
- डॉ. प्रिया हर्डीकर
स्त्रीरोगतज्ज्ञ

रस्ते, वीज, पाणी याप्रमाणे महिलांच्या स्वच्छतागृहांची मागणी हीदेखील मूलभूत गरज आहे. यासाठी आंदोलन करावे लागणे हीच दुर्दैवाची बाब आहे. या विषयाकडे बघण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन बदलणे महत्त्वाचे आहे.
- नयना सहस्रबुध्दे
भारतीय स्त्री शक्ती संघटना, राष्ट्रीय उपाध्यक्षा

Wednesday, 17 September 2014

यशस्वी होण्याचा राजमार्ग चला… यशस्वी होऊ या!

****प्रवीण दाभोळकर*****
पुस्तकाचे नाव : चला… यशस्वी होऊ या!
लेखक : सी.ई. पोतनीस
प्रकाशन : अमेय इन्स्पायरिंग बुक्स, पुणे
मूल्य : 160/- रु.  l  पृष्ठ : 132
आयुष्याच्या या स्पर्धेत यशस्वी व्हायचे स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगलेले असते. पण यातील काही जणांनाच यशाचे शिखर गाठणे शक्य होते. जीवनाप्रती आपली असलेली तळमळ, संस्कार, समाज, निश्चित ध्येय, उद्दिष्ट, सातत्य, मेहनत करण्याची तयारी अशा गोष्टी आपल्या यशाला कारणीभूत ठरत असतात. या गोष्टींवर विचार करता न आल्याने प्रामुख्याने तरुण मंडळी गोंधळलेल्या, द्विधा मनःस्थितीत असतात. ‘चला… यशस्वी होऊ या’ या पुस्तकाचे लेखक सी.ई. पोतनीस यांनी तरुणांची हीच मनःस्थिती ओळखून त्याच्याशी सुसंगत लेखन केले आहे. यात लिहिले गेलेले लेख लेखकाच्या प्रत्यक्ष अनुभवातून आल्याने त्याला वास्तवाचा स्पर्श आहे. पोतनीस यांना भारतात व परदेशात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. सीईओ या पदावर बारा वर्षांहून अधिक काळ यशस्वीपणे काम करत त्यांनी अनेक आस्थापनांचे नेतृत्व केले आहे. तसेच शारीरिक, मानसिक व नातेसंबंधातील समस्यांवर ते इतरांना मदत करतात. याशिवाय करिअर व आयुष्यावरील समस्यांवर ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. लेखकांना आजवर भेटलेल्या माणसांचा बरा-वाईट अनुभव, मार्गदर्शन, माणसे वाचण्याची चिकित्सक वृत्ती या सर्वांची शिदोरी या पुस्तकातून अनुभवायला मिळेल.
आपल्या प्रत्येकातच काही ना काही गुण असतात. पण न्यूनगंड व कमतरतेची भावना यामुळे ते गुण लुप्त होतात. लेखकही याच अनुभवातून गेला होता. पण त्यातून लेखकाला जगण्याचा वेगळा दृष्टिकोन प्राप्त झाला आहे, जो लेखणीतून उतरलेला दिसतो. ज्या न्यूनगंडामुळे आयुष्य समजायला वेळ जातो, त्या न्यूनगंडाचे आपण भक्ष्य न होता आपण आपली सकारात्मक ताकद ओळखत तिची व्याप्ती वाढविली पाहिजे. त्यामुळे ‘न्यूनगंड : शिकार नव्हे, शिकारी व्हा’ असा लेखच पुस्तकाची सुरुवात करतो. नेतृत्व आणि व्यवस्थापनातील गुण आपल्यात असल्याचे कालांतराने लेखकाच्या लक्षात आले, तसेच सकारात्मक विचार, मानसशास्त्र, अध्यात्म या विषयांची गोडीही याच दरम्यान लागली. संमोहनशास्त्राचा अभ्यासक्रमही शिकून झाला होता.
प्रत्येक तरुणामध्ये विविध गुण असतात. तरीही अनेकांना यश सतत हुलकावणी देत असते. जीवनाविषयी असलेल्या चुकीच्या समजुतीमुळे अनेक तरुणांना मार्गदर्शनाची असलेली गरज या पुस्तकाच्या वाचनाने पूर्ण होते. आपले यश हे केवळ आपलेच नाही, आपल्या यशाला असंख्य चांगल्या-वाईट प्रसंगांचा व व्यक्तींचा हातभार लागला आहे याची जाणीव असल्याने आयुष्याचे ध्येय विस्कटलेल्या तरुणांसाठी काम करण्याचे लेखकाने ठरविले. आईवडिलांपासून सुरू होऊन आपल्या आयुष्याच्या प्रवासात कळत-नकळत भेटलेल्या व्यक्ती, घटना, प्रसंग यांना लेखक सी. ई. पोतनीस आपल्या पुस्तकाचे श्रेय देतात.
आपल्या यशाची व्याख्या काय? हे प्रत्येकाने प्रथम मनाशी पक्के करायला हवे. कारण उत्तम शिक्षण व अनेक गुण असूनही आपण आयुष्य जगलो असे बऱ्याच जणांना वाटत नाही. यासाठी ध्येय निश्चित करणे, त्यासाठी ध्येयाचे महत्त्व पटवून घेणे महत्त्वाचे आहे. चांगली संधी मिळाली नाही, म्हणून आयुष्यात प्रगती करता आली नाही अशी काही जण ओरड करत असतात. आव्हानांना सामोरे गेल्यावरच संधी निर्माण होते. बऱ्याचदा यश व अपयश हे या दृष्टिकोनातील बदलानेच कळते. येणाऱ्या आव्हानांना आपण काय प्रतिसाद देतो, यावर परिणाम अवलंबून असतो. त्यामुळे लेखकाच्या मते आपल्या आव्हानांमध्ये संधी शोधण्याचा दृष्टिकोन किती आहे, यावर बरेच काही अवलंबून असते. प्रत्येक यशोगाथा या अपयशाच्या कहाण्या असतात. यशस्वी होण्याचा रस्ता अपयशाची आडवळणे घेऊनच आलेला असतो.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच यशस्वी आणि आनंदी जीवनासाठीची अष्टसूत्री चित्राच्या साहाय्याने रेखाटली आहे. पुस्तक हातात आल्यावर आधी मुखपृष्ठावरच लक्ष केंद्रित होते व आपण मुखपृष्ठाशी स्वत:ला तपासून पाहू लागतो. मलपृष्ठावर लेखकाच्या भारदस्त परिचयासोबत मुखपृष्ठाशी सुसंगत अशी मुद्देमांडणी केलेली आहे.
9773770507

दान निर्माल्याचे, रक्षण पर्यावरणाचे…

****प्रवीण दाभोळकर*****
जन, जल, जंगल, जमीन, जनावर आणि त्यांना व्यापणारे पर्यावरण यांचे संरक्षण, संवर्धन आणि विकास या दृष्टीने व्हिजन 2020 आराखडा तयार करून कार्यरत ठेवणे हे समर्थ भारत व्यासपीठचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या समर्थ भारत व्यासपीठ  व  ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश विसर्जनातील निर्माल्य व्यवस्थापन उपक्रम चालू आहे. यामार्फत पाने, फुले, केळीचे खांब अशा निर्माल्यातून गोळा झालेल्या वस्तूंना खत निर्मितीसाठी पाठविले जाते. तसेच सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकसारख्या अविघटनशील वस्तू पुनर्प्रक्रियेसाठी पाठविल्या जातात. हे निर्माल्य तळयात टाकून पाण्याचे प्रदूषण करण्यापेक्षा संस्थेकडे दिल्यास त्याचे खतात रूपांतर होते.
नंत चतुर्दशी…गणपती विसर्जनाचा दिवस. भक्तजनांच्या प्रचंड उत्साहात ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीसह बाप्पा आपल्या गावाच्या दिशेने निघाले होते. ठाण्यातील गडकरी रंगायतनजवळचा मासुंदा तलाव परिसरही असाच भाविकांच्या गर्दीने गजबजलेला. पोलिसांच्या देखरेखीत शिस्तबध्द पध्दतीने गणपती बाप्पा मासुंदा तलावाच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. हे दृश्य जवळजवळ सर्वच विसर्जन तलावांजवळ पाहायला मिळत होते. समर्थ भारत व्यासपीठाचे कार्यकर्ते प्रचंड गर्दीतही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. नववीत शिकणारी रेश्मा प्रभाकर वैराड ही विद्यार्थिनीही आपल्या आईसोबत समर्थ भारतने आयोजित केलेल्या मासुंदा तलावाजवळच्या निर्माल्य व्यवस्थापनाच्या सत्कार्यात हातभार लावत होती. ”पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा” असे या चिमुरडीचे सर्वांना सांगणे होते. रेश्मा व तिची आई आशा वैराड या महिला बचत गटाच्या माध्यमातून समर्थ भारत व्यासपीठशी जोडल्या गेल्या. सर्व भक्तजन गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत आकंठ बुडालेले असताना काही महिलांनी व त्यांच्या लहानग्यांनी निर्माल्य व्यवस्थापनाचे काम करून उपस्थितांना पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश देणे हे कौतुकाचे वाटले.
शिवाजी तलावाच्या बाजूलाच स्टॉल टाकला होता. तिथे उपस्थित कार्यकर्तेनिर्माल्यदान चळवळीत गणेशभक्तांना सामील होण्याचे आवाहन करत होते. ‘खत करू निर्माल्याचे, रक्षण करू पर्यावरणाचे’ हे या उपक्रमाचे घोषवाक्य येणाऱ्याजाणाऱ्यांचे लक्ष वेधत होते. गणपती विसर्जनाच्या वेळी सोबत आणलेले निर्माल्य तलावात टाकून प्रदूषणाला आमंत्रण न देता ते समर्थ भारत व्यासपीठाला दान करावे, जेणेकरून खतनिर्मितीसाठी या निर्माल्याचा उपयोग करता येईल व पर्यावरण समतोल राखला जाईल, हा यामागचा पर्यावरण रक्षणाचा विचार आहे.  दीड, पाच, सात व दहा दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या कालावधीत हे कार्य गेली चार वर्षे चालू आहे. मासुंदा तलावापासून समर्थ भारत व्यासपीठाच्या या उपक्रमाला सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी उपक्रम यशस्वी झाला. ठाणे महानगरपालिकेने त्याला मान्यता दिली. दुसऱ्या वर्षीपासून ठाणे महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन केंद्र, सफाई कामगार यांच्या सोबतीने हा उपक्रम राबवायला सुरुवात केली. शिवाजी तलावासोबतच मासुंदा तलावपाळी, रायलादेवी, आंबेघोसाळी, उपवन, कळवा गणेशघाट अशा ठाण्यात आठ ठिकाणी ठाणे मनपाचे सहा सफाई कामगार व बचत गटाच्या महिला यांना घेऊन समर्थ भारत व्यासपीठचे निर्माल्य व्यवस्थापनाचे कार्य चालते. या प्रत्येक ठिकाणी दोन ट्रक उपस्थित असतात, ज्यामध्ये विघटनशील व अविघटनशील असे निर्माल्याचे वर्गीकरण केलेजाते. समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम चालू आहे. कचराकुंडीत गोळा झालेले निर्माल्य ट्रकपर्यंत आणण्याचे काम ठाणे मनपाचे सफाई कामगार करतात. जास्तीत जास्त पर्यावरणस्नेही वस्तूंचा वापर करून, थर्माकोल वापर टाळून पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करावा, असे ठाणे मनपाचे सफाई कामगार कचराकुंडीजवळ येणाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करीत होते.
महिला बचत गटाचे योगदान
यापुढची जबाबदारी असते ती समर्थ भारत व्यासपीठ अंतर्गत चालणाऱ्या महिलांच्या बचत गटाची. या महिला विघटनशील व अविघटनशील असे आलेल्या निर्माल्याचे विभाजन करतात. परिसरातील साफसफाई हेच रोजीरोटीचे साधन असलेल्या या महिलांचा समर्थ भारत व्यासपीठने बचत गट तयार केला आहे. पहिल्या वर्षी त्या संपर्कात आल्यावर त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती, अनारोग्य, निरक्षरता असे त्यांचे विविध प्रश्न आहेत हे समर्थ भारत व्यासपीठच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे  पैशांची योग्य गुंतवणूक, साक्षरतेचे महत्त्व या महिलांना पटवून देण्यात आले. या महिलांचे गट तयार करून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये त्यांची खाती उघडली गेली. सफाई प्रशिक्षणासोबतच जॅकेट, टोपी, हातात घालण्यासाठी मोजे असे साहित्य या महिलांना देऊन त्यांचा आरोग्याची काळजीही घेतली जात असते. गणेश विसर्जनाच्या दिवसात निर्माल्य व्यवस्थापनाचे काम करताना मनापासून आनंद मिळतो. पण पर्यावरण समतोल राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी समजून गणेशभक्तांनी पर्यावरणस्नेही सजावट करायला हवी, असे महिला बचत गटाच्या सदस्या लक्ष्मी सुखदेव साबळे यांनी सांगितले. लक्ष्मीसोबतच सुमन भीमा चंदनशिवे, पूजा निकाळजे, आशा वैराड, रेश्मा वैराड या मासुंदा तलावाजवळच्या निर्माल्य व्यवस्थापनाच्या सत्कार्यात हातभार लावत होत्या. आंबेघोसाळी येथील विसर्जन तलावाजवळ कुसुम व दुर्गा सोनावणे या महिला कामासाठी होत्या. दहा महिलांचा मिळून एक, अशा पाच बचत गटाच्या महिला या उपक्रमात काम करीत आहेत. गणपती विसर्जनाच्या चार दिवसांपैकी सातव्या दिवशीच्या विसर्जनाला तुलनेने जास्त गर्दी असते, त्या वेळेस निर्माल्याने हा ट्रक पूर्णपणे भरलेला असतो.
खतनिर्मिती प्रक्रिया
पाने, फु ले,केळीचे खांब अशा विघटनशील वस्तू खत निर्मितीसाठी पाठविल्या जातात. तसेच सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकसारख्या अविघटनशील वस्तू पुनर्प्रक्रियेसाठी पाठविल्या जातात. हे निर्माल्य तळयात टाकून पाण्याचे प्रदूषण करण्यापेक्षा संस्थेकडे दिल्यास त्याचे खतात रूपांतर होते. विसर्जनाच्या चार दिवसात साधारणपणे 300 टन निर्माल्य संस्थेकडे गोळा होत असते. यामध्ये इतर सेवाभावी संस्थांचीही मदत होते. या सेवाभावी संस्था घराघरात, सोसायटीत जाऊन निर्माल्य गोळा करतात व समर्थ भारत व्यासपीठकडे सुपुर्द करतात. एस.टी.पी. प्लँट कोपरी येथे चालू असलेल्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाकडे निर्माल्याने भरलेले ट्रक रवाना होतात. खतनिर्मितीचे मोठया प्रमाणावर कार्य या ठिकाणी चालू असते. एस.टी.पी. प्लँटवर समर्थ भारत व्यासपीठचे कार्यकर्ते खत प्रक्रियेच्या कार्यात मदत करीत असतात.
पूर्वतयारी
गतवर्षी गणेश विसर्जनादरम्यान प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समर्थ भारत व्यासपीठ कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. प्लास्टिकच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी संस्थेने कापडी पिशव्यांचा पर्याय निवडला. गणेश पूजनापूर्वी गणेशमूर्ती कारखान्यात जाऊन कापडी पिशवी व माहितीपत्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. तसेच  महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना घेऊन 27 व 28 ऑगस्ट 2014 रोजी ‘हर बार इको त्योहार’ असा संदेश देणारी रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये ठाणे व कळवा महानगरपालिकेच्या शाळांमधली प्रत्येकी 150 मुले सहभागी झाली होती. तसेच समाजप्रबोधनासाठी ग्रीनीचा  (संदेश देणाऱ्या छोटयाशा रोपटयाचा) उपयोग करण्यात आला. पत्रकांच्या माध्यमातून आकर्षक पध्दतीने हा छोटा ग्रीनी ‘प्लास्टिकच्या पिशव्या टाळा, कापडी पिशव्या बाळगा, पर्यावरणाचे संवर्धन करा’ असे संदेश देई. यामुळे गणेशोत्सवापूर्वी व त्या दरम्यानही हा पत्रकातील ग्रीनी चर्चेचा विषय बनला.
ठाणे शहराचा विकास आराखडा
2005मध्ये समर्थ भारत व्यासपीठने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने ठाणे शहरासाठीचा विकासाचा आराखडा तयार केला. पुढच्या वीस वर्षांनी कचरा, पर्यावरण, पाणी अशा महत्त्वाच्या बाबींचे व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेची ध्येयधोरणे ठरवण्यात आली. त्यानंतर शून्य कचरा मोहिमेला सुरुवात झाली. घरच्या घरी कचरा व्यवस्थापन, निर्माल्य व्यवस्थापन अशा कार्यक्रमांना याअंतर्गत सुरुवात झाली. समाजकार्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या सामाजिक संस्थांना घेऊ न ठाणे जिल्हा सामाजिक संस्था निर्धार समितीची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंना या महोत्सवाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ देण्यात आली. संस्थेमार्फत दर वर्षी सफाई कामगार, शिक्षिका, खेळाडू, परिचारिका, डॉक्टर, वकील, शिक्षिका अशा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकी एका महिलेचा सत्कार करण्यात येतो.
जन, जल, जंगल, जमीन, जनावर आणि त्यांना व्यापणारे पर्यावरण यांचे संरक्षण, संवर्धन आणि विकास या दृष्टीने ‘व्हिजन 2020′ आराखडा तयार करून कार्यरत ठेवणे हे समर्थ भारत व्यासपीठचे प्रमुख उद्दिष्ट आहे. स्वामी विवेकानंद व अब्दुल कलाम यांचे भविष्यातील भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास समर्थ भारत व्यासपीठने घेतला आहे. ठाण्याप्रमाणे पुणे, धुळे, सोलापूर या शहरातही समर्थ भारत व्यासपीठचे अविरत कार्य चालू आहे. दाऊद दळवी हे समर्थ भारत व्यासपीठ ठाणे शाखेचे अध्यक्ष आहेत, तर भटू सावंत, आरती नेमाणे, रीना गायकवाड, हितेश सगारिया हे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून संस्थेत काम करत आहेत. ठाणे शहराचा सर्वांगीण विकास या संकल्पपूर्तीसाठी संस्थेने ठाणेकरांना ‘आठवडयातील एक तास ठाणे शहरासाठी’ असे आवाहन केले आहे. ठाणे शहरातील देवालयांतील व नऊ स्मशानभूमीतील फुले गोळा करून त्यापासून खत तयार करण्याचा समर्थ भारत व्यासपीठचा मानस आहे.
 9773770507




Thursday, 14 August 2014

दहीहंडीसाठी वाट्टेल ते..

*******प्रवीण दाभोळकर*****
9773770507

दहीहंडी हा काही खेळ नाही, ती आपली संस्कृती आहे. दहीहंडीला आपण आपली संस्कृती मानतो, तर त्या संस्कृतीची जपणूक करणे ही आपली जबाबदारी आहे. एकजूट, एकशक्ती, एकच लक्ष्य या समूहगुणांचे प्रतीक म्हणून गोविंदाकडे पाहिले जाते. यापैकी एकाचाही अभाव असेल, तर दहीहंडीचा रंग फिका होतो. सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदाने समूहाचे हे गुण आपल्या व्यक्तिगत जीवनातही अवलंबायला हवेत. न्यायालयाचा निर्णय आणि गोविंदांच्या भावना यांचा मध्यबिंदूdahi_handi_0004सांधणारा निर्णय सर्वानुमते मान्य व्हायला हवा. काही दिवसांवर आलेली दहीहंडी, त्यात उच्च न्यायालयाने दहीहंडी पथकांत सहभागी होण्यासाठी घातलेली 18 वर्षेवयाची व  दहीहंडीसाठी घातलेली 20 फूट उंचीची मर्यादा यामुळे सर्वच दहीहंडी पथके संभ्रमात पडली आहेत. मात्र आपल्याला हव्या त्या पध्दतीने दहीहंडी साजरी करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची गोविंदांची तयारी आहे.
काही दिवसांवर आलेली दहीहंडी, त्यात उच्च न्यायालयाने दहीहंडीत सामील होणाऱ्यांवर घातलेली 18 वर्षे वयाची व दहीहंडी बांधण्यावर घातलेली 20 फूट उंचीची मर्यादा यामुळे सर्वच दहीहंडी पथके संभ्रमात पडली आहेत. प्रत्येक दहीहंडी पथकामागे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. दहीहंडीच्या दिवशी येण्याजाण्याचा खर्च, गोविंदांचे जेवणखाण, टी-शर्ट, आपत्कालीन व्यवस्था यांचा खर्च दहीहंडी मंडळे करत असतात. गेल्या काही वर्षात दहीहंडी पथकांच्या प्रत्येक थरामागे लाखो रुपयाची उधळण होत गेली. वर्षागणिक आयोजकांनी थर वाढवत हंडी उंच उंच नेली. आणि हे आव्हान पेलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पथकांना पैसा, प्रसिध्दी मिळत गेली. उंचावरच्या थरांमुळे सरावादरम्यान व दहीहंडीच्या दिवशी होणाऱ्या अपघातांमध्येही वाढ होत गेली. यंदा सरावादरम्यान झालेला बाल गोविंदांचा मृत्यू, त्यात बालहक्क आयोगाने घातलेले लक्ष, प्रसारमाध्यमांनी दिलेली प्रसिध्दी यामुळे सरकारने आपल्या भूमिकेत बदल केला. उच्च न्यायालयानेही दहीहंडीवर कडक निर्बंध घातले आहेत. ‘कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, पण आतापर्यंत होत आली तशीच दहीहंडी साजरी होणार’ असा बुचकळयात टाकणारा पवित्रा दहीहंडी समन्वय समितीने घेतला आहे. एकामागोमाग घडत गेलेल्या अशा सर्व घटनांमुळे दहीहंडीच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, एवढे मात्र नक्की…
1881610दहीहंडीची पार्श्वभूमी
दहीकाला हा महाराष्ट्रातील जनसमूहाचा उत्सव आहे. श्रीकृष्णाने गायी चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केलाव सर्वांसह त्याचे भक्षण केले,अशी कथा सांगितली जाते. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. यांचे खेळगडी जेव्हा घरोघरी जातात, तेव्हा त्यांच्या डोक्यावर घागरी भरून पाणी ओतले जाते. कोणी कोणी आपल्या घरापुढे शक्य तितक्या उंचीवर दह्याची हंडी बांधत व हंडीखाली मानवी मनोरा उभा करून त्यावर चढून एखाद्या लहान मुलाने आपल्या मुठीने ती हंडी फोडावी, अशी या सणाची पार्श्वभूमी आहे. पूर्वापार हा सण म्हणूनच साजरा केला जात आहे. पण गेल्या दशकभरात दहीहंडीला ‘इव्हेंट’चे स्वरूप मिळाले आहे. दहीहंडीमध्ये पैशांची गुंतवणूक झाली, ग्लॅमर मिळाले, गोविंदांचा उत्साह वाढला. त्यातूनच दहीहंडीची साहसी खेळात गणना व्हावी यासाठी प्रयत्न झाले.
दहीहंडीची तयारी
खास दहीहंडी उत्सवानिमित्त शरीरयष्टी बनविण्यासाठी अनेक तरुण व्यायामशाळांकडे वळले आहेत. दहीहंडीच्या थराचा टिकाव लागण्यासाठी नियमित व्यायाम व खास खुराकही या मंडळींनी चालू केला आहे. खालच्या थराला असणाऱ्या गोविंदांची उंचीच साधारणत:  पाच ते सहा फूट एवढी असते, त्यात उच्च न्यायालयाने दहीहंडीसाठी आखलेली वीस फुटाची मर्यादा, याने जेमतेम तीन ते चारच थर लागू शकतात.
Bala-Padelkar
कोर्टाच्या निर्णयाचा आम्हाला अवमान करायचा नाही, पण सरकारने आमची बाजू विचारात न घेतल्याने कोर्टाने हा निर्णय दिला आहे. दहीहंडी त्याच उत्साहात साजरी होणार आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला सरकारच सर्वस्वी जबाबदार असेल. बाळा पडेलकर अध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती
दहीकाला उत्सवाला काही दिवस उरले असताना दहीहंडीचा थर वीस फुटांपर्यंत असावा आणि सहभागी गोविंदांचे वय किमान 18 वर्ष असावे असा ऐतिहासिक निकाल उच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या निकालामुळे जवळजवळ सर्वच गोविंदा पथकात नाराजीचे वातावरण आहे. गेले महिना-दोन महिने सर्वच गोविंदा पथकातील पुरुष-महिला गोविंदा पथकांनी दहीहंडीचा कसून सराव केला आहे. दहा वर्षापासून ते 35 ते 40 वयोगटातील गोविंदांनी आपला कामधंदा सांभाळून तालमीला हजेरी लावतात. दहीहंडीसाठी इच्छुक असलेल्या गोविंदांची फिटनेस टेस्ट घेतली जात नसली, तरीही यातील बहुतांश मुले-मुली कबड्डी, खो खो अशा खेळांशी संबंधित असतात. त्यामुळे त्यांनी शरीराचा चांगला फिटनेस राखलेला असतो. त्यांच्याकडून शिस्तबध्द पध्दतीने दहीहंडीच्या थरांचा नियमित सराव करून घेतला जातो. येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या पालकांशी वैयक्तिक संवाद साधला जातो, त्यांना विश्वासात घेतले जाते, त्यानंतरच मुलांना पथकात सामील केले जाते.
दहीहंडीतून समाजकार्य
PRATAP-SARNAIK
माझा उत्सवाला विरोध कधीच नव्हता आणि नसेल. पण न्यायालयाच्या आदेशाच्या आम्ही विरोधात जाणार नाही. दहीहंडी उत्सव म्हणून खूप चांगल्या पध्दतीने साजरा होईल, पण न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच! आमदार प्रताप सरनाईक
गेल्या 25 ते 30 वर्षांपासून अनेक मंडळांची गोविंदा पथके आहेत. ‘दहीहंडींच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांवरच मोफत व्यायामशाळा, रक्तदान शिबिर, वह्यावाटप असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आमच्या मंडळातर्फे होत असतात. दहीहंडीच्या दिवशी मिळालेल्या पैशांवर या कार्यक्रमांची आखणी ठरलेली असते. आम्ही जर चारच थर लावले, तर आमच्या मंडळांचे अर्थार्जन कसे होणार? आणि पुढच्या वर्षभरातील कार्यक्रम कसे होणार? याची आम्हाला चिंता वाटते आहे’ असे गोविंदा पथकांचे म्हणणे आहे. दहीहंडी सणावर अवलंबूनच आम्ही दर वर्षी खर्च करत नियमित चाललेल्या उत्सवात कुठे खंड पडू नये, असे गोविंदा पथकांना वाटते.
खेळाडूंच्या नजरेतून दहीहंडी..
फक्त चार थर लावण्याची अट म्हणजे दहीहंडीतील थरार काढून घेतल्यासारखे आहे. त्यामुळे दहीहंडी बंद पाडण्यासाठी हे चाललेय का? असे अशी शंका काही गोविंदा व्यक्त करतात. असे झाले तर दहीहंडीचा उत्सव कालांतराने बंद होण्याची शक्यताही ते व्यक्त करतात. स्पेनसारख्या देशात उंचच उंच मनोरे रचण्याची एक शिस्तबध्द परंपरा आहे. त्यातले त्यांचे कौशल्य वादातीत आहे. म्हणूनच गेली काही वर्षे त्यांना दहीहंडीसाठी खास निमंत्रित केले जाते.
दहीहंडीच्या दिवशी अनेक गोविंदा जखमी झाल्याचे चित्र आपण प्रसारमाध्यमांतून पाहतो. पण हे खूप चुकीच्या पध्दतीने दाखविले जात असते. मात्र नियमित कसून सराव, तसेच शिस्तबध्द पध्दतीने मनोरे रचल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, याची खात्री मोठमोठया पथकांकडे पाहिले तर पटेल. दहीहंडीच्या थरांवरून कोसळणाऱ्या गोविंदांपेक्षा त्या दिवशी दुचाकीवरून फिरताना होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त असते. पण अशा अपघातग्रस्तांची संख्याही गोविंदांच्या अपघातात गृहीत धरली जाते. पर्यायाने गोविंदाच्या अपघातात वाढ असे चित्र सर्वसामान्य घरांपर्यत पोहोचत असते, असा गोविंद पथकांचा दावा आहे. प्रसारमाध्यमांतून झालेल्या या प्रसारामुळे या वर्षी प्रत्येक पथकात गोविंदांची संख्या 40 ते 50 ने घटली आहे. खरे तर, सर्वच साहसी खेळांमध्ये कमी-जास्त प्रमाणात जीवाला धोका असतो. पण यातील साहसामुळेच या खेळाची वेगळी उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते.
 राज्य सरकारचा आम्ही धिक्कार करतो. मराठी सणांवर घालण्यात आलेला हा घाला आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाचे पालन सर्वत्र केले जाईल. उत्सव नेहमीप्रमाणेच जल्लोशात साजरा होईल, पण मी स्वत: दहीहंडीत सहभागी नसेन. आमदार बाळा नांदगावकर  
राज्य सरकारचा आम्ही धिक्कार करतो. मराठी सणांवर घालण्यात आलेला हा घाला आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाचे पालन सर्वत्र केले जाईल. उत्सव नेहमीप्रमाणेच जल्लोशात साजरा होईल, पण मी स्वत: दहीहंडीत सहभागी नसेन.
आमदार बाळा नांदगावकर
”निव्वळ पैसा मिळविणे हा दहीहंडी पथकांचा हेतू कधीच नसतो, तर या उत्सवामुळे अनेक माणसे एकमेकांना जोडली जात असतात, आपली संस्कृती साऱ्या जगाला दिसून येत असते” असे मत गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. वरळीतील एका दहीहंडी पथकाचे ज्येष्ठ प्रशिक्षक म्हणाले की, ”मी 1990पासून दहीहंडीच्या थरांवर होतो. तेव्हा आम्ही सहा थरांची सलामी देऊन खाली उतरायचो. तिथपासून पुढची 12 ते 15 वर्षे आम्ही सहा थरांवरच मर्यादित होतो. पण गेल्या पाच वर्षांत जोरदार स्पर्धा वाढली आहे. राजकारणी, सेलिब्रेटी यांच्या हस्तक्षेपामुळे दहीहंडीचा इव्हेंट झाला आहे. एक थर जास्त लावला तर राजकारणी लाखभर रुपये मोजायला तयार असतात, तेवढाच मानमरातबही प्रसिध्दीमाध्यमांमुळे त्या दिवशी आम्हाला मिळत असतो. आपण किती थर लावू शकतो याची मर्यादा प्रत्येक संघाला व त्यांच्या प्रशिक्षकाला माहीत असते. त्यामुळे ऐन वेळी उत्साहाच्या भरात एखादा थर वाढविणे हे केव्हाही चुकीचेच ठरते.”
न्यायालयाने सुवर्णमध्य साधावा
उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि काही दिवसांवर आलेली दहीहंडी यामुळे दहीहंडी समन्वय समिती गोंधळात पडली आहे. ”आम्हाला कोर्टाचा अवमान करायचा नाही, पण गोविंदांच्या भावना लक्षात घेऊन कोर्टाने अध्यादेश काढत आपला निर्णय मागे घ्यावा” असे दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर पत्रकार परिषदेत म्हणाले. ”आम्ही गेली अनेक दिवस सरकार दरबारी फेऱ्या मारत आहोत. सरकारने आमची बाजू कोर्टासमोर मांडण्याचे आश्वासन दिले होते. पण कोर्टाच्या निर्णयामुळे सरकारने विश्वासघात केल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे दहीहंडीचा सण मोठया जल्लोशात साजरा होणार व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील” असा इशाराही पडेलकर यांनी दिला. तेव्हा, ‘मायबाप सरकारने पुन्हा एकदा आमची बाजू कोर्टासमोर मांडावी आणि योग्य तो निर्णय मिळावा, अशी समन्वय समितीने विनंती केली आहे.
काही आयोजकांची माघार
‘दहीहंडीला खेळाचा दर्जा द्या’ असे सांगणाऱ्या काही राजकारण्यांनी सरावादरम्यान झालेल्या मृत्यूंमागचे गांभीर्य ओळखून आपल्या दहीहंडीचे आयोजन ऐनवेळी रद्द केले आहे. पण यामुळे दहीहंडी सणावर काही परिणाम होणार नाही. ”दहीहंडीमुळेच आज अनेक आयोजक मोठे झाले आहेत, यशस्वी राजकारणी झाले आहेत. पण आज दहीहंडीला त्यांची गरज असताना त्यांनी आयोजकत्व रद्द करणे चुकीचे आहे,” असे मत दहीहंडी समन्वय समितीने व्यक्त केले आहे. या आयोजकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार समिती करत आहे.
govinda01साहसी खेळाचा दर्जा देण्याची मागणी
दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, तर त्याला वेगळे महत्त्व प्राप्त होईल. शाळांमध्ये हा खेळ शिकविला गेला, तर मुलांमध्येही या खेळाबद्दल आत्मीयता निर्माण होईल. वर्षातून एकदा अनुभवायला मिळणारे हे चित्तथरारक क्षण सातत्याने अनुभवायला मिळाले, तर त्यातील खेळाडूंनाही प्रोत्साहनच मिळणार आहे. याच माध्यमातून खेळाडूंना नोकऱ्या मिळाल्या, तर या माध्यमातून एक चांगली पिढी घडू शकते असा विचार दहीहंडीत वर्षानुवर्षे सहभागी होणारी पथके हिरिरीने मांडत आहेत.
वास्तवाकडे डोळेझाक नको
चांगले प्रशिक्षक व प्रशिक्षण नसलेल्या गोविंदा पथकांमध्येच अपघातांची संख्या जास्त असते, असे काही गोविंदांचे म्हणणे आहे. मुलांना सराव देणारे प्रशिक्षित असतात. किशोरवयीन व लहान मुलांमध्ये दहीहंडींचे आकर्षण आहे. दहीहंडीसाठी येणारी ही मुले स्वत:हून आलेली असतात की घरातील मंडळींचाही त्यांना पाठिंबा असतो, यामागे त्यांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती कितपत कारणीभूत असते, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. क्षमतेबाहेरचे थर फोडण्याचा प्रयत्न करताना वरच्या थरावर असलेल्या बालगोविंदाच्या जिवाची बाजी लागत असते, याचा विचार करणेही गरजेचे आहे. उंचच उंच थर लावणाऱ्या आयोजकांनी गोविंदांच्या संरक्षणाची कोणती जबाबदारी घेतलेली असते? हे सर्वांसमोर येणे गरजेचे आहे. दहीहंडीला ग्लॅमर आल्याने पुढाऱ्यांचा उत्साह, दहीहंडीतील गुंतवणूक वाढल्याचे दिसून येते. आपली राजकीय ताकद वाढविण्यासाठी पुढारी दहीहंडीच्या गोविंदांचा वापर करतात का? आणि गोविंदा त्यांचे कळत नकळत समर्थन करत असतात का? गोविंदांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. दहीहंडीचा दिवस संपल्यावर पैसा, प्रसिध्दी आणि आनंद या गोष्टी गोविंदांना कमीअधिक प्रमाणात मिळालेल्या असतात. याचसोबत सुरक्षितताही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण दर वर्षी किती गोविंदा जायबंदी होतात, त्या अपघातग्रस्त मुलांशी गोविंदा पथकांचा वर्षभर संपर्क असतो का? त्यांच्या भविष्याबाबत विचार केला जातो का? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
दहीहंडी हा खेळ नाही. ती आपली संस्कृती आहे. दहीहंडीला आपण आपली संस्कृती मानतो, तर त्या संस्कृतीची जपणूक करणे ही आपली जबाबदारी आहे. एकजूट, एकशक्ती, एकलक्ष्य या समूहगुणांचे प्रतीक म्हणून गोविंदाकडे पाहिले जाते. यापैकी एकाचाही अभाव असेल, तर दहीहंडीचा रंग फिका होतो. सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदाने समूहाचे हे गुण आपल्या व्यक्तिगत जीवनातही अवलंबायला हवेत. न्यायालयाचा निर्णय आणि गोविंदांच्या भावना यात सुवर्णमध्य साधला जायला हवा.

 आतापर्यंत सगळयाच गोविंदा पथकांनी यामध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे. आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो, पण गोविंदांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन कोर्टाने मध्यवर्ती भूमिका घ्यावी.
अरुण पाटील
प्रशिक्षक, माझगाव ताडवाडी