Sunday, 26 January 2014

पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृतीप्रित्यर्थ एकांकीका स्पर्धा

  पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भव्य राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धां लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. व्योम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेतर्फे पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती चषक या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नामदेव ढसाळांच्या साहीत्यावर प्रेम करणारी, कलाक्षेत्रात वावरणारी तरुण मंडळी मोठ्या जल्लोषात या स्पर्धेची तयारी करीत आहेत. एकीकडे स्पर्धेचे पोस्टर्स-बॅनर्स सगळीकडे रसिकांचे लक्ष वेधुन घेत आहेत तर फेसबुककर मंडळीमध्येही या स्पर्धेची जोरदार चर्चा होत आहे.  

   स्पर्धेची प्राथमिक फेरी पु.ल.देशपांडे अकादमी, प्रभादेवी येथे 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या वर्षातच नागपुर, लातूर, औरंगाबाद, जळगाव, सांगली,कणकवली, पुणे, देवगड या विभागातल्या एकांकीका स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रथम पारीतोषीक 75,000, द्वितीय पारीतोषीक 50,000, तृतीय 25,000 अशी रोख रक्कम विजेत्यांना मिळणार आहे. तसेच वैयक्तीक चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कमही विजेत्यांना देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेची अंतिम फेरी ही स्वा. सावरकर सभागृह, शिवाजीपार्क येथे 14 फेब्रुवारी रोजी पार पडेल.  संस्थेच्या पदार्पणाच्या वर्षात पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती चषक एकांकीका स्पर्धेद्वारे जेष्ठ साहीत्यीक नामदेव ढसाळ यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न व्योम प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.

 स्पर्धेसाठी सर्व स्तरातुन खुप चांगला पाठींबा मिळत असुन ही स्पर्धा रसिकांना निशुल्क असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे. अधिक माहीती आणि नोंदणीसाठी तुषार कदम-9773567511 व विरेन परब-9773861170 या क्रमांकावर स्पर्धकांनी संपर्क करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.



                                                                 -प्रवीण दाभोळकर  

No comments:

Post a Comment