निवडणुकीचे सर्वे-क्षण
निवडणुका तोंडावर आल्यायत..कोण
जिंकेल कोण हरेल देवास ठावूक..पण सर्वच राजकीय पक्षांची सध्या जय्यत तयारी चालली
आहे. कधी स्वपक्षीयांच्या चुकांना वोट-बॅंक मूळे पाठीशी घातल जातय तर कुठे उगीच
विरोधकांना विरोधक म्हणुन विरोध करायच चाललय. कोणी नवीन पक्ष तयार केले आहेत तर कोणी
आलटी-पलटी मारुन पुन्हा त्याच पक्षात येत आहेत. आपल्यासोबत कोणी राजकारण खेळलेल
मला आवडत नाही. पण राजकारणाच्या गप्पा बोलायला-ऐकायला मात्र आवडतात.
असच राजकारणाविषयी बोलतचालत
असताना एका मित्राने राजकारणाच काम आणल. निवडणुकीच्या तोंडावर एका मिडीया रिसर्च
ब्युरोसाठी निवडणुकीचा सर्वे करायचा होता. निवडणुकीच्याआधी लागणारा एक्सीस्ट पोल
हा अशा सर्वेमधुनच लागत असावा. मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन जनमताचा अंदाज
बांधायचा होता. मानल तर कठीण, दगदगीच काम होतपण आणि नाही पण. मला मात्र काम
करण्यात मज्जा येणार होती. कारण बरेच दिवसांनी ग्राउंडलेवलवर काम करायला मिळणार
होत आणि महत्वाच म्हणजे पैसेही चांगले मिळणार होते.प्रत्येक आमदाराच्या मतदार
संघात सहा नगरसेवक..त्या प्रत्येक विभागाचा मॅप प्रत्येकाकडे होता. प्रत्येक
मतदारसंघात एक शिवाजी नगर, एखाद भिम नगर तसेच दर्गा रोड हे मोहल्ले हमखास दिसत
होते. कोणाच्या घरी जाउन विचारण्याची मुभा नव्हती. कोणीही सुशिक्षीत-अशिक्षीत
नागरीक ज्याला मतदानाचा हक्क असेल अशा मतदारांशी चर्चा करायची होती. प्रत्येकाला
बाटलीत उतरवायच होत. कोणाला वैयक्तीक काही न विचारता राजकारणाविषयी त्याच्याकडची
सरव माहीती बोलता बोलता काढुन घ्यायची आणि त्यावरुन फॉर्म भरत संध्याकाळी रिपोर्ट
बनवायचा. प्रत्येक विभाग हा जास्तीकरुन त्याच्या
धर्मावरुन एखाद्या पक्षाची व्होट बॅंक बनला आहे अस प्रथमदर्शनी दिसुन आल. महागाई,
भ्रष्टाचार वाढला अस मान्य करतही मुस्लिम बांधवाचं कॉंग्रेसप्रेम दिसलं. काही
उत्तर भारतीय बांधवानी या निमित्ताने राज ठाकरेंवर चांगल तोंडसुख घेतल. भिमसैनिक
तर कोणाच्या मागे जायच, कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवायचा याबाबत साशंक दिसले. पण
जास्तीत जास्त माणस ही हमको क्या करना है..हम भले..हमारा काम भला..अशाच विचाराचे
होते. नरेंद्र मोदींच्या कामाबद्दल माहीत नाही तरी मोदी पंतप्रधान व्हावेत अशी
इच्छा व्यक्त करणारेही भेटले. नमोंच्या सोशल मिडीयाची जादु बर्यापैकी चाललेली दिसत
होती. दिल्लीत आम आदमी पार्टीच्या
स्थापनेनंतर मतदार थोडे बुचकळ्यात पडले. आम आदमी पार्टीची उमेदवारी अजुन घोषित
केली नव्हती तरी मतदारांना आम आदमी पार्टीचा उमेदवार विभागातुन यावा असे दिसले.
गेल्यावेळी नमोंच्या नावाचा जप करणारी मंडळी आम आदमी वर खुष होती. आम आदमीला पुढे
करुन कॉंग्रेसने भाजपासोबत शाळा खेळली की काय अस वाटायला लागल. पण अस असेल तर भाजपपेक्षा
कॉंग्रेस-कॉंग्रेस करणारेच महागाई, भ्रष्टाचाराला कंटाऴुन आम आदमी महाराष्ट्रातही
जादु करण्याची वाट बघत होते. शेवटी हे राजकारणच..कधी काय
होईल सांगता येत नाही..आपल्याला काय करायचय याच मताचा मीही कधी होतो असेन. पण एक
मात्र शिकायला मिळाल आपले मतदार असण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्व देतात. थोड्या
दिवसांत गल्लीपासुन दिल्लीच्या राजकारणातले क्षण ऐकायला मिळाले, निवडणुकीचे
सर्वे-क्षण एंजोय करता आले.
-प्रवीण दाभोळकर
No comments:
Post a Comment