माध्यम महोत्सवाची धूम
Friday, 27 December 2013
सॅन्टाक्लॉज भेटला तेव्हा.....
सॅन्टाक्लॉज भेटला तेव्हा.....
परवा अचानक यश माझे पाय पकडुन पायातले मोजे काढायला लागला. रात्री नाताळ बाबा (सॅन्टाक्लॉज) येतो आणि मोज्यामध्ये गिफ्ट्स ठेऊन जातो असे यावर्षी त्याचे कोणीतरी कान भरलेले होते. पण मोज्यांची स्थिती बघुन त्याला नाताळ बाबाची दया आली असावी. मोज्यांच्या सुवासाने नाताऴबाबा जवळ फिरकणार ऩाही असा त्याने अंदाज बांधला आणि मोठी प्लास्टीकची पिशवी घेवुन बाहेर गेला. कागदावर आपल्याला हवे ते लिहुन रात्री झोपायच मग सकाऴी गिफ्ट मिळत अशी त्याच्या पंटर लोकांच्या मिटींगमध्ये ठरलेल होत.नाताऴच्या सुट्टी एन्जोय करायला भाचा यश घरी आलायं. मामाच्या घरी आल्यावर उशिरा उठणे, मस्ती करणे,मारामारी करणे, मग फटके खाणे-देणे आणि त्याच्याच वयाच्या 7-8 वर्षाच्या मुलांना घेवुन अभ्सासेत्तर उपक्रम करणे हा दिनक्रम..तरीसुद्धा मामाचा लाडका भाचा...
रात्री जेवण झाल्यावर ही सगळी लहान कारटी एकामेकांच्या घरी जाउन सोक्स-पिशव्या फाटल्यायत का, उघड्या आहेत का, नाताळ बाबाला नक्की दिसतील ना याचा सर्वे करत होती. यांच नक्की काय चाललय याकडे सुरुवातीला आमच कोणाच लक्ष नव्हत. दुसर्या दिवशी सकाऴी 6 वाजता यश उठला. मी उठण्याची वाट बघत होता. हातातली रीकामी पिशवी बघितल्यावर मला कारण समजल. पिशवीमध्ये एका कागदावर I want watch.. अस पेन्सिलने लिहलेल होत पण पिशवी रीकामीच हेती. दुसर्या एरीयातुन यायला सॅन्टा ला वेळ मिळाला नसेल अशी कशाबशी त्याची समजुत काढली. पहील्या दिवशी सॅन्टाक्लॉजने कोणाला काहीच दिल नाही म्हणुन सर्व पंटर एकत्र जमल्यावर सर्वांनी मिळुन सॅन्टाक्लॉजचा सडकुन समाचार घेतला. सॅन्टा-बॅंन्टा-फॅन्टा अशा सॅन्टाक्लॉजला शिव्या घालायला सकाळपासुनच सुरुवात केली.
यश साठी घड्याळ आणावं
लागणार असं सकाळी बाहेर पडताना ठरवलेल. रात्री 11 वाजले घरी पोहोचायला. सकाळी लवकर
उठल्याने भाचा डाराडुर होता. दरवाज्याच्या बाहेर जाऊन पिशवीत बघितल तर तोच कागद पण
मजकुरात थोडा बदल होता. Santaa…sorry..because
I call u santa-banta-fanta कागदावर मागच्या बाजुस
ख्रिसमस ट्री काढलेली होती. Dear
santa, this gift for u…अस ही लिहीलेल होत..एरवी
ह्याला कधी बदडवतोय अस वाटणार्या भाच्याची कीव आली आणि तसाच जवळच्या दुकानात गेलो.
पट्टी, पेन्सिल, रबर, कलर बॉक्स, कॅडबरी अशा रात्री दुकानात भेटलेल्या वस्तु
पिशवीत टाकल्या. आणि खाली काही मजकुर लिहीला. सकाऴी यश चे एक्सप्रेशन बघायच ठरवल.
गिफ्ट बघुन जाम खुष होता.मला उठवायला आला..आता त्याची आयुष्याची झोप उडालेली दिसत
होती. गिफ्ट्स बघुन वॉच विसरला होता. आमच्या दोघात काय चाललय हे घरातल्यांना
कळण्यापलीकडे होत. म्हटल, सॅन्टाक्लॉज चा सध्या टाईम बेकार चालला असेल म्हणुन वॉच
दिल नसेल. यशच्या हातात कागद
होता,त्याला वाचायला सांगितला. If you
do study properly and got 1st
rank..santa will give u watch….यश ला त्याच उत्तर
मिळाल होत.
Tuesday, 24 December 2013
विद्यालंकार मध्ये घुमला माय मराठीचा गजर
विद्यालंकार मध्ये घुमला माय मराठीचा गजर
`
`
दरवर्षीप्रमाणे विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कॉलेजमध्ये "माय मराठी" या सांस्कृतिक जल्लोष खूपच दिमाखात पार पडला. समस्त माय मराठीच्या शिलेदारांनी अतिशय सुंदर रित्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम पार पडला. यावर्षीच्या नवव्या पर्वाची सर्वसाधारण थीम हि "महाराष्ट्रातल्या रूढी परंपरा " अशी होती.
गणरायाच्या "पहिल नमन" ने कार्यक्रमाची सुरुवात झाली.. आणि नंतर ओव्या, वासुदेव, गौळण, लावणी सोबत मल्लखांबाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा रांगडेपणा दिसलाच पण सोबत होती ती हातात समशेरी घेऊन आलेल्या रणरागीणींची. संपूर्ण महाराष्ट्राचे लोक वैभव एक एक करून उलगडत होते....स्त्री जन्माच्या व्यथेवर परखडपणे भाष्य करणारा नृत्याभिनय "रिकाम्या सांजेची घागर","घाव पडला" या गाण्यांवर सादर करण्यात आला.
अक्षरश: अंगावर काटा आणि डोळ्यांत पाणी अशी काही प्रेक्षकांची स्थिती होती.त्याचा शेवट आणखीन दुःखदायक होणार असं वाटत असतानाच विठूमाउलीच्या तालावर संपूर्ण मायमराठीच्या शिलेदारांनी फेर धरला.. आणि माउलीचे पालखीच्या रूपाने आगमन झाले.... आणि काही क्षणार्धात साक्षात पंढरपूरची वारी जनसमुदायाचा भेटीला आली....जवळ जवळ ११८ वारकर्यांनी वातावरण भारून टाकले.......एका स्त्री चा प्रवास....सोबत परंपरांचा अभिमानी पताका फडकावत हे माय मराठीचे ९ वे पर्व दिमाखात पार पडले .
प्रविण दाभोळकर
Saturday, 21 December 2013
‘होरायझन’ची कीर्ती
कीर्ती महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या होरायझन फेस्टिव्हलची कॉलेज विश्वात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गेमिंग व इतर हटके स्पर्धांची धमाल, विद्यार्थ्यांचा सळसळता उत्साह आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या सोबत कीर्तीचा होरायझन फेस्ट दणक्यात झाला. मनोरंजनातून शिक्षण ही होरायझनची विचारसरणी अनेक स्पर्धांमधून दिसून आली. ACCENTURE कंपनीचे सुबोध सुर्वे आणि आशिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झालेल्या दप्तर चित्रपटाच्या कलाकारांनी उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढविली. सुबोध सुर्वेंनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी उलघडून सांगितल्या तर दप्तर चित्रपटाचे दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ व अभिनेते यश शहा, अभय कामत यांनी गप्पांमधून दप्तर चित्रपटाची कथा व फेस्टिव्हलपर्यंतचा प्रवास सांगितला. होरायझनमधील ट्रेजर हंट, वन मिनीट गेम, डीजे मिक्सिंग या स्पर्धांना तरुणांनी चांगलीच पसंती दिली. कॉलेजिअन्समधील गेमिंगची क्रेझ पाहता लॅन गेमिंग, मोबाईल गेमिंग तसेच मारीओ, रोडरॅश या स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांचा उत्साह विलक्षण होता. काही दिवसांत खुद्द कीर्ती महाविद्यालयात चित्रीकरणास सुरुवात होणार्या राजभाषा चित्रपटाची टीम विद्यार्थ्यांच्या भेटीला आली होती. दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज, अभिनेत्री विशाखा, संगीतकार कौशल ईनामदार यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. होरायझनने मुंबईत सर्वप्रथम टेकफेस्टची सुरूवात केली असे मानले जाते. तरुणांची गेमिंग मधील दिवसेंदिवस वाढती क्रेझ लक्षात घेऊन कीर्ती महाविद्यालयाने या वर्षीचा होरायझन रीवॉल्यूशन ऑफ गेमिंग या थीमवर आधारित होता. महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाने सुरू केलेल्या होरायझनने सर्वांना आपलंस केलंय, असे म्हणत प्राचार्य मगरे सरांनी कौतुकाने पाठ थोपटली तर होरायझनने आज मला कीर्तीची नवी ओळख पटवून दिल्याचे संगीतकार कौशल इनामदार यांनी सांगितले.
- प्रवीण दाभोळकर
Thursday, 12 December 2013
जोशी बेडेकर महाविद्यालयने ओलांडला उत्कर्षचा उंबरठा
तरुणांची उत्सुकता ताणुन धरलेल्या उंबरठा एकांकिका स्पर्धेची मानकरी जोशी बेडेकर महाविद्यालायच ओश्तोरिज" ही एकांकीका ठरली. ह्रुषीकेश कोळी लिखीत व अमोल भोर दिग्दर्शित ओश्तोरिज ने उंबरठाच्या निमीत्ताने पुन्हा एकदा प्रेक्षक-परीक्षकांची वाहवा मिळविली. प्राथमिक फेरीत तब्बल ३२ एकांकिके मधून निवडल्या धमाकेदार ६ एकांकिका निवडल्या गेल्या. एम डी नाट्यगण " कारशेड", वि ग़ . वझे केळकर महाविद्यालय " अहमा ", साई सान्निध्य क्रियेशन " राजा ", जोशी बेडेकर महाविद्यालय " ओश्तोरिज", सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स महाविद्यालय " फुगा", झेप कलामंच " ई एम सी स्क्वेअर ". ह्या ६ एकांकिकेतून उत्कर्षाचा उंबरठा ओलांडला तो जोशी बेडेकर महाविद्यालायची " ओश्तोरिज" ह्या एकांकिकेने तब्बल सहा पारितोषिक वर शिका मोर्तब करीत उंबरठा च्या चषकावर आपला हक्क धरून ठेवला. दुसऱ्या क्रमांक पटकवला तो वि ग़ . वझे केळकर महाविद्यालयची " अहमा" ह्या तर तिसऱ्या मनाची ठरली ती झेप कलामंच " ई एम सी स्क्वेअर ". उंबरठा साठी प्रमुख पाहुणे लाभले ते ज्येष्ठ दिग्दर्शक किरण वि. शांताराम तर परीक्षक म्हणून अशोक समेळ व श्रीमती फयाझ ह्यांनी परीक्षण केले आय एन टी, स्पंदन, उत्तुंग अश्या एकांकिका स्पर्धैनंतर सर्वांच लक्ष्य वेधून होते ते उत्कर्षचा उंबरठ्याचा मानकरी ठरणार कोण यावर. सोमवारी ९ डिसेंबर सकाळी ९ वाजल्यापासूनच हाऊस फ़ुल्ल करीत रविंद्र नाट्य मंदिरात तरुणाईच्या जल्लोषात सुरु झाली. स्व. श्रीकांतजी ठाकरे ह्यांच्या स्मरणार्थ उत्कर्ष सेवा मंडळातर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात उंबरठा खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित होत असते. ज्याला कॉलेजिअन्स आणि मराठी कलाकारांचा भरघोस प्रतिसाद मिऴत असतो.
-प्रविण दाभोळकर
वर शिका मोर्तब करीत उंबरठा च्या चषकावर आपला हक्क धरून ठेवला. दुसऱ्या क्रमांक पटकवला तो वि ग़ . वझे केळकर महाविद्यालयची " अहमा" ह्या तर तिसऱ्या मनाची ठरली ती झेप कलामंच " ई एम सी स्क्वेअर ". उंबरठा साठी प्रमुख पाहुणे लाभले ते ज्येष्ठ दिग्दर्शक किरण वि. शांताराम तर परीक्षक म्हणून अशोक समेळ व श्रीमती फयाझ ह्यांनी परीक्षण केले आय एन टी, स्पंदन, उत्तुंग अश्या एकांकिका स्पर्धैनंतर सर्वांच लक्ष्य वेधून होते ते उत्कर्षचा उंबरठ्याचा मानकरी ठरणार कोण यावर. सोमवारी ९ डिसेंबर सकाळी ९ वाजल्यापासूनच हाऊस फ़ुल्ल करीत रविंद्र नाट्य मंदिरात तरुणाईच्या जल्लोषात सुरु झाली. स्व. श्रीकांतजी ठाकरे ह्यांच्या स्मरणार्थ उत्कर्ष सेवा मंडळातर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात उंबरठा खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित होत असते. ज्याला कॉलेजिअन्स आणि मराठी कलाकारांचा भरघोस प्रतिसाद मिऴत असतो.

Friday, 6 December 2013
'चांगभलं!'
7 डीसेंबर सामना अंकात प्रकाशित
महाविद्यालयांमध्ये सध्या महोत्सवांच वार घोंगावतयं..सर्व कॉलजिअन्स सध्या महोत्सवांच्याच धामधुमित आहेत. परळ येथील गोखले एज्युके शन सोसायटीच्या डॉ . टी. के. टोपे रात्र महाविद्यालयाचा वार्षिक उत्सव असाच एक महोत्सव 'चांगभलं!' दिनांक ९ ते १४ डिसेंबर या संपूर् ण सप्ताहात पार पडणार आहे. 'चांगभलं!' उत्सवाची 'सगळ्यचं भल होवो!, सर्वांचं चांगल होवो !', हेच ध्येय आणि प्रार्थना आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी विविद गुणदर्शन स्पर्धात सहभागी व्हावे, हि महविद्यालयाचे प्राचार्य वि. ब. रोकडे आणि सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. ढेंगळे यांची भूमिका आहे. दिवसभर. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे प्रामुख्याने गिरणगा वातील विद्यार्थ्यांसाठी महावि द्यालयातर्फे मेहंदी, चित्रकला, हस्ताक्षर,निबंध, गायन, वक्तृत्व, वादविवाद, काव्यवाचन, एकपात्री अभिनय, व प्रश्नमंजुषा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे . गेल्या २७ वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या महाविद्यालयाच् या या वार्षिक उत्सवात सुमारे ५ ०० ते ७०० विद्यार्थी सहभागी हो त असतात . महाविद्यालयाचा 'चांगभलं!' महोत्सव यशस्वी रीतीने पार पडावा यासाठी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी अथक परिश्रम घेत आहेत.
-प्रविण दाभोळकर
Subscribe to:
Posts (Atom)