रुईया महाविद्यालयात सेल्फ व्हिजनतर्फे अंध विद्यार्थ्यांसाठी लुई ब्रेल डे चे आयोजन
माटुंग्याच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात
सेल्फ व्हिजनतर्फे अनोखा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला. महाविद्यालयातील
अंध विद्यार्थ्यांसाठी लुई ब्रेल डे चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. यामध्ये महाविदयलयातील अंध विद्यार्थ्यांनी
मिळुन अनेक मनोरंजनाचे कार्यक्म सादर केले. नृत्य, गायन, नाट्य तसेच योग
मल्लखांबाच्या कसरतींचा नजराणा पेश करत उपस्थित सर्वांचीच वाहवा मिळविली. नटरंग
चित्रपटातील दमदार नांदी सादर करीत कार्यक्रमाचा श्री गणेशा केला. तसेच इतर
चित्रपटांच्या गितांवर बहारदार नृत्य सादर करत योगासनांची प्रात्यक्षीकेही सादर
करण्यात आली.
कार्यक्रमाचे अजुन एक आकर्षण म्हणजे
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे आणि मराठी सुपरस्टार भरत जाधव यांनी
कार्यक्रमात आपली उपस्थिती दाखविली. कार्यक्रमाचे उद्घाटन करत भरत जाधवने
कलाकारांचे भरभरुन कौतुकही केले. कलेच्या सादरीकरणात रोप मल्लखांबाची जोड दिल्याने
प्रेक्षकांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला. अंध विद्यार्थ्यांसाठी सेल्फ व्हिजन
सेंटरने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेच्या विजेत्यांचा
बक्ष्स समारंभही या निमित्ताने करण्यात आला.
कलाकारांनी पु.ल देशपांडेच्या लेखनावर आधारीत
नाटुकली सादर करीत प्रेक्षकांमध्ये एकच हशी पसरविला. डिस्को दिवाने या गाण्यावर
नृत्य करीत व मराठी ब्लॉक बस्टर दुनियादारीचा टायटल ट्रॅक प्रस्तुत करीत
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व अंध
विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात व त्यांना आत्मविश्वास देण्याची परंपरा रुईया
महाविद्यालयाने याहीवर्षी टिकविली.
-प्रविण दाभोळकर
No comments:
Post a Comment