सॅन्टाक्लॉज भेटला तेव्हा.....
सॅन्टाक्लॉज भेटला तेव्हा.....
परवा अचानक यश
माझे पाय पकडुन पायातले मोजे काढायला लागला. रात्री नाताळ बाबा (सॅन्टाक्लॉज) येतो
आणि मोज्यामध्ये गिफ्ट्स ठेऊन जातो असे यावर्षी त्याचे कोणीतरी कान भरलेले होते.
पण मोज्यांची स्थिती बघुन त्याला नाताळ बाबाची दया आली असावी. मोज्यांच्या
सुवासाने नाताऴबाबा जवळ फिरकणार ऩाही असा त्याने अंदाज बांधला आणि मोठी
प्लास्टीकची पिशवी घेवुन बाहेर गेला. कागदावर आपल्याला हवे ते लिहुन रात्री झोपायच
मग सकाऴी गिफ्ट मिळत अशी त्याच्या पंटर लोकांच्या मिटींगमध्ये ठरलेल होत.नाताऴच्या सुट्टी एन्जोय करायला भाचा यश घरी आलायं. मामाच्या घरी आल्यावर उशिरा उठणे, मस्ती करणे,मारामारी करणे, मग फटके खाणे-देणे आणि त्याच्याच वयाच्या 7-8 वर्षाच्या मुलांना घेवुन अभ्सासेत्तर उपक्रम करणे हा दिनक्रम..तरीसुद्धा मामाचा लाडका भाचा...
रात्री जेवण झाल्यावर ही
सगळी लहान कारटी एकामेकांच्या घरी जाउन सोक्स-पिशव्या फाटल्यायत का, उघड्या आहेत
का, नाताळ बाबाला नक्की दिसतील ना याचा सर्वे करत होती. यांच नक्की काय चाललय
याकडे सुरुवातीला आमच कोणाच लक्ष नव्हत. दुसर्या दिवशी सकाऴी 6 वाजता यश उठला. मी
उठण्याची वाट बघत होता. हातातली रीकामी पिशवी बघितल्यावर मला कारण समजल.
पिशवीमध्ये एका कागदावर I want
watch.. अस पेन्सिलने लिहलेल होत पण पिशवी रीकामीच हेती. दुसर्या
एरीयातुन यायला सॅन्टा ला वेळ मिळाला नसेल अशी कशाबशी त्याची समजुत काढली. पहील्या
दिवशी सॅन्टाक्लॉजने कोणाला काहीच दिल
नाही म्हणुन सर्व पंटर एकत्र जमल्यावर सर्वांनी मिळुन सॅन्टाक्लॉजचा सडकुन समाचार
घेतला. सॅन्टा-बॅंन्टा-फॅन्टा अशा सॅन्टाक्लॉजला शिव्या घालायला सकाळपासुनच सुरुवात
केली.
यश साठी घड्याळ आणावं
लागणार असं सकाळी बाहेर पडताना ठरवलेल. रात्री 11 वाजले घरी पोहोचायला. सकाळी लवकर
उठल्याने भाचा डाराडुर होता. दरवाज्याच्या बाहेर जाऊन पिशवीत बघितल तर तोच कागद पण
मजकुरात थोडा बदल होता. Santaa…sorry..because
I call u santa-banta-fanta कागदावर मागच्या बाजुस
ख्रिसमस ट्री काढलेली होती. Dear
santa, this gift for u…अस ही लिहीलेल होत..एरवी
ह्याला कधी बदडवतोय अस वाटणार्या भाच्याची कीव आली आणि तसाच जवळच्या दुकानात गेलो.
पट्टी, पेन्सिल, रबर, कलर बॉक्स, कॅडबरी अशा रात्री दुकानात भेटलेल्या वस्तु
पिशवीत टाकल्या. आणि खाली काही मजकुर लिहीला. सकाऴी यश चे एक्सप्रेशन बघायच ठरवल.
गिफ्ट बघुन जाम खुष होता.मला उठवायला आला..आता त्याची आयुष्याची झोप उडालेली दिसत
होती. गिफ्ट्स बघुन वॉच विसरला होता. आमच्या दोघात काय चाललय हे घरातल्यांना
कळण्यापलीकडे होत. म्हटल, सॅन्टाक्लॉज चा सध्या टाईम बेकार चालला असेल म्हणुन वॉच
दिल नसेल. यशच्या हातात कागद
होता,त्याला वाचायला सांगितला. If you
do study properly and got 1st
rank..santa will give u watch….यश ला त्याच उत्तर
मिळाल होत.
No comments:
Post a Comment