नामदेव ढसाळांच्या साहीत्यात एवढी ताकद आहे की, प्रत्येक कथा, कादंबरी काव्यातुन वेगळी एकांकीका होउ शकते, असे गौरवोद्गार नामदेव ढसाळ स्मृतीप्रीत्यर्थ एकांकीका स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यात जेष्ठ परिक्षक अजित भगत यांनी काढले. नामदेव ढसाळ स्मृतीप्रीत्यर्थ एकांकीका स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा नुकताच स्वा.सावरकर सभागृहात पार पडला. व्योम प्रतिष्ठानतर्फे आयोजित एकांकीका स्पर्धेत महाराष्ट्रभरातुन अनेक एकांकीका सादर झाल्या. झेप कलामंच, मुंबईच्या E=MC2 या एकांकीकेने बाजी मारली. नाट्यमय ठाणेच्या ओश्तोरीज एकांकीकेला दुसरे तर डॉ. बी.ए.एम विद्यापिठ, औरंगाबाद यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकवता आले. रंगसंगती कलामंचच्या नही तो गोली मार दुंगा या एकांकीकेला प्रेक्षक पसंतीची एकांकीका म्हणुन गौरविण्यात आले. 15 फेब्रुवारी हा पद्मश्री नामदेव ढसाळांचा जन्मदिवस. त्याच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन पुर्वसंध्येला हा अविस्मरणीय सोहळा मान्यवर तसेच तरुणाईच्या साक्षीने पार पडला.
व्योम प्रतिष्ठानच्या पदार्पणाच्या वर्षात
घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत महाराष्ट्रभरातुन 29 संस्था
सहभागी झाल्या होत्या. ज्यामध्ये झेप कलामंच
मुंबईची E=MC2, स्टेज ड्रीमर प्रोडक्शन, पुणेची बास्टर्ट, अश्वमेध थिएटर्स, नाशिक
येथील पाणीपुरी, रंगसंगती कलामंच मुंबईची नही तो गोली मार दुंगा, डॉ. बी.ए.एम
विद्यापिठ, औरंगाबादची गांडु बगीचा, नाट्यमय ठाणेच्या ओश्तोरीच या पाच एकांकीकेत
अंतिम फेरीची चुरस पहायला मिळाली.
सर्वोत्कृष्ट
दिग्दर्शनाचे पारितोषिक ओश्तोरिचसाठी अमोल भोर तर सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक E=MC2 साठी विनायक चव्हाण याला मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री हे
अनुक्रमे पाणीपुरीसाठी प्राजक्त तर बास्टर्टसाठी गंधाली घाटे यांनी पटकावले.
प्रकाश योजना-भुषण देसाई (ओश्तोरीच), नेपथ्य- सचिन गावकर(ओश्तोरीच), पार्श्व
संगीत-राहुल जोगळेकर (बास्टर्ट), संगीत संयोजन- सुमेध चव्हाण (नही तो
गोली.....)तसेच रंगमंच व्यवस्था- नाट्यमय जोशी (ओश्तोरीच) यांना देण्यात आले.
अजित भगत, हेमंत लबदे, नारायण राजम तसेच तुलसी
बेहरे, शर्वरी पिल्ले यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले. एवढ्या चांगल्या
उपक्रमाला जाहीरातदार मिळणे ही शोकांतीका असल्याचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
सिनेट मेंबर ऑफ महाराष्ट्र डॉ. राजेंद्र तेंडुलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात
व्यक्त केली. महाराष्ट्रभरातुन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे
व्योम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार कदम यांना आभार मानले.
-प्रविण दाभोळकर
No comments:
Post a Comment