एमडीचा स्फूर्ती
महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या एन. एस. एस. युनिटचा स्फूर्ती हा आंतर-महाविद्यालयीन कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. अनेक महाविद्यालयांच्या एन. एस. एस. स्वयंसेवकांनी स्फूर्तीमध्ये हिरीरीने भाग घेतला. स्फूर्ती कार्यक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धांमध्ये रस्ता सुरक्षा, महिला सबलीकरण, एच.आय.व्ही./एड्स व्यसनमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता असे विविध सामाजिक विषय हाताळण्यात आले. या सामाजिक विषयांवर आधारीत स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या एकूण ३२ महाविद्यालयांनी आपला सहभाग दाखविला.
पथनाट्य, पोस्टर, वादविवाद, काव्यवाचन आणि कॉलेजमार्फत राबवण्यात येणारा उत्कृष्ट प्रकल्प या माध्यमातून सामाजिक विषय हाताळण्यात आले. पथनाट्य स्पर्धेत रुईया महाविद्यालय, तर वादविवाद स्पर्धेत डॉ. टी. के. टोपे महाविद्यालयाने प्रथम पारितोषिक पटकावले. पोस्टर मेकींग स्पर्धेत रुपारेल महाविद्यालय व काव्यवाचन स्पर्धेत सिद्धार्थ महाविद्यालयाने बाजी मारली. उत्कृष्ट सामाजिक उपक्रम सादरीकरणातही सिद्धार्थ महाविद्यालयच अव्वल ठरले. एम.डी महाविद्यालयाच्या नावाजलेल्या कबड्डीपटू गौरी वाडेकर आणि सुवर्णा बारटक्के यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना सत्कारमूर्ती म्हणून महाविद्यालयातर्फे गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य महामार्ग पोलीस डॉ. रश्मी करंदीकर यांनी स्वयंसेवकांना रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले तसेच ‘स्वरक्षा’ या अनोख्या मोबाईल ऍपची माहिती दिली. ज्याचा वापर अपघात स्थळी, व महत्त्वाच्या वेळी, मदतीसाठी केला जाऊ शकतो. सर्व विद्यार्थ्यांनी हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून ‘स्वरक्षा’ला पाठिंबा दर्शविला.स्वीडनवरून आलेल्या ग्लोबल कॉलेजच्या प्राध्यापकांनीही स्फूर्ती इव्हेंटला भेट दिली. एम.डी महाविद्यालयाच्या एन.एस.एस.युनिटने वर्षभरात वॉल ऑफ फेम, रस्तासुरक्षा या विषयावर राबवलेल्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
-प्रवीण दाभोळकर
No comments:
Post a Comment